आता शाळेतील कर्मचाऱ्याचे होणार चरित्र पडताळणी : शिक्षण आयुक्तांचे आदेश !

शालेयवृत्त सेवा
0

 



औरंगाबाद (शालेय वृत्तसेवा) :

नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळेतील सर्व शिक्षक प्रशासक कर्मचारी शिपाई यांचे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन अर्थात चरित्र पडताळणी करण्यात यावी तसेच चरित्र पडताळणी ची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यात यावी असे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली.



शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते यावेळी मांढरे यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली बैठकीत शिक्षण विभागाला त्यांनी विविध आदेश दिले आहेत या संदर्भातील माहिती मांढरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.  विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्यावरून शाळांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच शिक्षण विभाग अशा शाळांवर काय कारवाई करतो यावरही पालकाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात एका शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभाग अधिक कडक पाऊल उचलत आहे.


येत्या 13 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे शाळांमध्ये येणारे नवीन विद्यार्थी असतील तसेच बऱ्याच खाजगी शाळांमध्ये नवीन स्टॉप नेमण्यात येतो त्यावेळी ओळखीच्या अथवा परिचित व्यक्तीकडून नेमण्यात आलेल्या व्यक्तींच्या ट्रॅक्टर विषयी माहिती असावी त्यांच्यावर काही गुन्हा तर दाखल नाही ना किंवा काही कारवाई यापूर्वी झाली आहे का तसेच शाळेत असलेल्या स्टॉपच्या वर्षभरातील वर्तनाविषयी देखील पडताळणी करावी असेही मांढरे यांनी सांगितले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)