जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढवा - शिक्षणाधिकारी सविता बिरगे | EO Savita Birage, Nanded

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती शोभा भारती मॅडम यांना दिला निरोप !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय गुणवत्ता वाढवा, दोन वर्ष्यापासून कोरोना मुळे शाळा बंद आहेत त्या मुलांना पुन्हा शाळेत टिकवणे अवघड काम आहे. ते आवाहन सर्वांनी स्वीकारावे. जिल्हा परिषदेचा शाळा टिकल्या पाहिजेत त्यांचा पट वाढला पाहिजे. शंभर टक्के पट नोंदणी झाली पाहिजे. बदली पोर्टल, प्रोफाइल अपडेट, स्टुडंट पोर्टल वरील माहिती अपडेट करा असेही म्हणाले.


विभाग निळा च्या वतीने शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती शोभा भारती मॅडम यांची  यांचा निरोप समारंभ कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा या ठिकाणी केंद्राच्या वतीने घेण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी बोलत होत्या.


         निरोपाच्या कार्यक्रमास प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे मॅडम, श्री नागराज मारोती बनसोडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड, श्री रुस्तुम आडे शिक्षण विस्तार अधिकारी बीट तरोडा, श्रीमती लता कौठेकर मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी बीट निळा, श्री धोपटे व्ही.एस.केंद्रप्रमुख केंद्र निळा, अंतर्गत चे सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या ग्रामपंचायत निळा च्या सरपंच कोमल रोहित हिंगोले ह्या होत्या.नुकतेच प्रा.शाळा आलेगाव येथे आलेले तंत्रस्नेही श्री डांगे सर यांचा ही या ठिकाणी केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.  आपल्या प्रास्ताविकेतून बोलताना श्री चोंडे सर यांनी भारती मॅडम यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.



        या कार्यक्रमाच्या सुरुवातीस निळा शाळेतील विध्यार्थिनींनी वेशभूषेत येऊन स्वागत गीत गायिले आणि शिक्षणाधिकारी श्रीमती बिरगे मॅडम यांचे मन जिंकून घेतले. त्यांनी मुलींचे स्वागत केले. आणि शाळेच्या पटसंख्येबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका यांना जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्याचे आवाहन केले.बदली पोर्टल वरील माहिती अपडेट करणे,स्टुडंट पोर्टल वरील विध्यार्थ्यांच्या माहिती अपडेट करून घेणे. आधार अपडेट आणि आधार मिसमॅच चे काम पूर्ण करणे.इत्यादी सूचना दिल्या.


          मा नागराज बनसोडे  गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या भाषणातून गुणवत्ता वाढली पाहिजे आणि राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना सर्वांना शुभेच्छा दिल्या.   शिवाजी पाटील सर आणि सावळे सर यांनी शिक्षकांमधून तर धोत्रे मॅडम आणि मरळक च्या मॅडमनी शिक्षिकामधून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.


        निरोपस उत्तर देताना श्रीमती भारती मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.आणि आत्तापर्यंत जसे मला सहकार्य केले तसेच या पुढे श्रीमती लता कौठेकर मॅडम यांनाही सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.श्रीमती कविता हुंडेकर मॅडम यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन केले तर पोहरे सरांनी आभार व्यक्त केले.


       यावेळी मा. शिक्षणाधिकारी मॅडम यांनी शाळेतील पटसंख्या आणि शालेय परिसर याची स्तुती केली. शाळेचा रंगरंगोटी केलेला बाह्य भाग पाहुणे समाधान व्यक्त केले. तर मी पुन्हा गुणवत्ता बघायला परत येईन तेव्हा प्रत्येक वर्गात जाऊन रंगरागोटी ची पाहणी करणारे असल्याचे सांगितले.    मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम यांनी संपूर्ण जिल्ह्यात राबवलेल्या वडाच्या झाडाची लागवड या उपक्रमांतर्गत लावलेल्या झाडाची पाहणी केली आणि आज कें.प्रा.शाळा निळा येथे एक कडुनिंबाचे झाड लावण्यात आले.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)