नंदुरबार ( गोपाल गावीत) :
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या नियोजनानुसार शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्राची माता रमाई माध्यमिक विद्यालय प्रकाशा येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माता रमाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण भामरे, वैजाली शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, अनुदानित बुंदलेश्वर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जगदीश बावा, केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. शिक्षण परिषद मागोवा केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी माहिती दिली. शैक्षणिक प्रक्रिया शिक्षण परिषद रविंद्र पाटील कन्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी माहिती दिली. शिक्षण परिषद प्रभावी अंमलबजावणी करिता केंद्रप्रमुख ,केंद्रसंसाधन समूह यांची भूमिका व जबाबदारी प्रशांत भामरे यांनी माहिती दिली.
पुनरर्चित सेतू अभ्यासक्रम २०२२-२३ प्रभावी राबविण्याकरीता चर्चा डामरखेडा शाळेचे मुख्याध्यापक विश्वास माळी,नांदर्डे शाळेचे शिक्षक कैलास गव्हाणे यांनी माहिती दिली. शाळा पूर्वतयारी शाळानिहाय आढावा व मेळावा उपक्रमाबाबत केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी माहिती सांगितली. विद्याप्रवेश शाळा पूर्व तयारी कार्यक्रम-इयत्ता पहिली रामलाल पारधी यांनी माहिती दिली.
केंद्रातील शैक्षणिक गरजाधारीत विषय गुणवत्ता वाढीसाठी वैजाली शाळेचे शिक्षक राजू मोरे व नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेल्या शिक्षक बांधवांनी प्रभावीपणे सहभागी होऊन माहिती दिली. केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रशासकिय कामकाज केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी माहिती सांगितली. उपस्थित शिक्षण परिषद सर्व शिक्षक बांधवांचे आभार प्रदर्शन शिंपी सर यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .