राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे नाव आता " क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार " | Maharashtra State Teachers Award

शालेयवृत्त सेवा
0

 




मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकामुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते.


राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव शिक्षकाकडून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून ऑनलाइन मागविण्यात येतात. अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचना निकषानुसार जिल्हास्तरावर जिल्हा निवड समिती प्रस्तावाचे छाननी करून प्रवर्गनिहाय पात्र प्रस्ताव शिक्षण संचालक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या राज्य निवड समितीकडे पाठवीते. सदर शिफारशीवर शिक्षकांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करून राज्य निवड समितीकडून शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात. पुरस्कार सर्वसाधारणपणे 15 ऑगस्ट रोजी जाहीर करून त्याचे प्रत्यक्ष वितरण 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिनांकाला सन्माननीय व्यक्तीच्या हस्ते करण्यात येते.


संदर्भातील क्रमांक 1 येथील शासन परिपत्रक दिनांक 21 जुलै 2016 अन्वये राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार बाबतचे निकष सुधारित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सुधारणा करून सदर योजना " क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार " या नावाने बाबत शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत संदर्भातील पत्र क्रमांक 2 दिनांक 24 फेब्रुवारी 2022 अन्वे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला आहे.


राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारित करून सदर योजना "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार " या नावाने राबविण्यात शासन मान्यता दिली आहे.


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार


प्रस्तावासाठी आवश्यक अटी :


◼️शिक्षकांनी नामनिर्देशन साठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकाने प्रमाणित करणे आवश्यक


◼️मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक


◼️शिक्षक मुख्याध्यापकांचे एकुण सलग सेवा किमान दहा वर्षे आवश्यक


◼️शिक्षकाचे मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल


◼️विभागीय चौकशी सुरू नसल्याचे शिक्षण अधिकारी यांचे प्रमाणपत्र


◼️शिक्षकांनी केलेल्या लगतच्या पाच वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल


◼️प्रतिनियुक्ती वरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.


◼️शिक्षकांच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.



🟤17 मुद्दे आणि 100 गुण :


🔷प्राथमिक 38 पुरस्कार / माध्यमिक 39 पुरस्कार


🔷आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणारे शिक्षक प्राथमिक 19 पुरस्कार 


🔷थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8


🔷विशेष शिक्षक कला क्रीडा 2


🔷दिव्यांग शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक 1


🔷स्काऊट / गाईड 2


⬛अशाप्रकारे एकूण पुरस्कार 109



◼️जिल्हा निवड समिती गठन :


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचना निकषानुसार जिल्हास्तरावर प्राप्त प्रस्तावांची छाननी करून जिल्ह्यातून गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय निवड होणाऱ्या प्रवर्गनिहाय प्राप्त शिक्षकांची शिफारस राज्य निवड समितीकडे करण्याकरिता जिल्हास्तरावर जिल्हा निवड समिती गठित करण्यात येणार आहे.



◼️राज्य निवड समिती गठन :

 

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी जिल्हा निवड समितीकडून जिल्ह्यातून प्रवर्गनिहाय गुन्हा अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय शिफारस पात्र शिक्षकांना राज्य निवड समिती प्रत्यक्ष मुलाखतीस प्राचार्य करेल. अस्तित्वात असलेल्या निकषानुसार ऑनलाइन पडताळणी व छाननी करून शिक्षकांची अंतिम निवड करताना शिक्षकांना शैक्षणिक सामाजिक दर्जा तसेच सामाजिक समता स्त्री पुरुष समता समानता याबाबत संवेदनशीलता व त्यासाठी केलेले विशेष प्रयत्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून विशेष व कार्य उपक्रम राज्य निवड समितीने विचारात घ्यावेत. सदर शिफारशीवर शिक्षकांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करून राज्य निवड समितीकडून शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास पाठवण्यात येईल.


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराची निवड प्रक्रिया शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून राबविले जाईल. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रक्रियेसाठी निवड करण्याकरता ऑनलाइन प्रक्रिया तांत्रिक जबाबदारी शिक्षण आयुक्तालयातील संचालयातील इ गव्हर्नमेंट सेल ची राहील.


शिक्षकांनी सादर केलेली माहिती खोटी अथवा प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आल्यास अवैध रद्द करण्यात येईल. राज्य निवड समितीची बैठक घेण्यापूर्वी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शिक्षकांनी सादर केलेली प्रमाणपत्रे संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घेऊन व त्यानंतर ती राज्य निवड समितीकडे समितीपुढे ठेवण्यात येईल.


सन 2022-23 चे वर्ष हे "शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष " म्हणून साजरे करण्यात येत आहे त्यामुळे प्रत्येक नामांकन करणाऱ्या शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी लागणाऱ्या दृष्टिकोण अर्जातून मांडावा व समितीने त्याची माहिती शासनास अवगत करावी.



🔷प्रतिवर्षी "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया वेळापत्रक सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे राहील :


◼️एप्रिल - जाहिरात प्रसिद्धी

◼️मे - ऑनलाइन नामांकन नोंदणी

◼️जून - जिल्हास्तर समितीद्वारे नामांकनाची प्रत्यक्ष पडताळणी

◼️जुलै - राज्यस्तर समिती पडताळणी

◼️ऑगस्ट - नामांकन अंतिम करणे व शासनास सादर करणे

◼️सप्टेंबर - पुरस्कार वितरण समारंभ.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)