वयाच्या ५० / ५५ व्या वर्षापलिकडे / अर्हतकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकिय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुर्नविलोकन होणार..

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

उपरोक्त संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वयाच्या ५०/५५ व्या वर्षापलिकडे अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांची शासन सेवा पुढे चालू ठेवण्याची पात्रता आजमिविण्यासाठी विहित निकषांच्या आधारे त्याचे पुनर्विलोकन करुन, सुयोग्य व कायक्षम अधिकारी / कर्मचारी यांनाच लोकहितास्तव शासन सेवेत पुढे चालू ठेवावे व अकार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात यावे, अशा सूचना दिलेल्या आहेत.



उपरोक्त संदर्भ क्रमांक १ च्या पत्रान्वये उच्च शिक्षण संचालनालय व त्याच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट अ व गट-ब संवर्गातील ज्या अधिकाऱ्यांनी वयाची ५०/५५ वर्षे किंवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण केली आहे, त्यांचे सेवा पुनर्विलोकनाचे परिपूर्ण प्रस्ताव (सपूर्ण सेवा कालावधीचे गोपनीय अहवाल व परिशिष्ट ब मधील माहितीसह) शासनास सादर करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.


तरी आपल्या महाविद्यालयातील / संस्थेतील कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी / शिक्षकीय पदे यांनी वयाची ५०/५५ वर्षे किंवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण केली आहे, त्यांचे सेवा पुनर्विलोकनाचे परिपूर्ण प्रस्ताव (सपूर्ण सेवा कालावधीचे गोपनीय अहवाल व परिशिष्ट-ब मधील माहितीसह) संचालनालयास तात्काळ सादर करण्यात यावे. अशा आशयाचे परिपत्रक काढले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)