नांदेड ( मिलिंद जाधव ) :
भोकर तालुक्यातील तेलंगना सिमेवर असलेल्या दिवशी बु.गावातील एका शेतकरी कुटुंबातील शिक्षक श्री सुमेद चापाजी गुंडेराव यांनी पीएच. डी. पूर्ण केली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अध्यापनाचे कार्य करत सखोल अभ्यास व मेहनत करुन प्रा. डॉ. आर. बी. लक्षटे देगलूर महाविद्यालय , देगलूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जनार्दन वाघमारे एक राजकीय नेतृत्व: चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन केले. नुकतेच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली आहे. ग्रामिण भागातील एक होतकरू शिक्षक विद्यावाचस्पती होवून तरूणांसाठी एक आदर्श बनला आहे. त्यांच्या यशाबद्धल सर्व स्तरावरून आभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भोकरचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी माधव वाघमारे, विस्तार अधिकारी दिलीप सुपे,केंद्र प्रमुख नंदेवाड सर, मुख्याध्यापक गौराजी हौसरे, शालेय समितीचे अध्यक्ष शिवप्रसाद कदम, सहकारी शिक्षक मोरीलवाड,माळवदकर ,लिंगदळे, तृप्ती फटाले, सुरेखा तोषटवार, सौ मोमीन मॅडम तसेच मिलिंद जाधव, हिराचंद्र कदम आदिंनी डॉ. सुमेद गुंडेराव यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .