जिल्हा परिषद : नांदेड शिक्षण विभागातील २९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ..

शालेयवृत्त सेवा
0

 



 जिल्हा परिषद प्रशासकीय 10 तर 19 विनंती बदल्या चा समावेश !


नांदेड (शालेय वृत्तसेवा ):

शासन निर्णयाच्या निकषानुसार समुपदेशनाने बदली प्रक्रिया दिनांक 20 मे पासून पार पडत आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात असणाऱ्या जागांच्या समानीकरण यानुसार पारदर्शक बदल्या करण्यात येत आहे. मंगळवारी शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या 29 बदल्या करण्यात आले आहेत. 


नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वांधिक बदली प्रक्रिया समुपदेशनाद्वारे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहे. मंगळवारी बदली प्रक्रियाच्या चौथ्या दिवशी शिक्षण विभागाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 


राजपत्रित मुख्याध्यापक पदाची प्रशासकीय कारणावरून 1 बदली झाली. केंद्रप्रमुख पदाच्या प्रशासकीय 2 बदल्या झाल्या. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या 8 बदल्या करण्यात आल्या यात प्रशासकीय 2 तर विनंतीने 6 बदल्या करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात प्रशासकीय 5 तर विनंतीवरून 9 बदल्यांचा समावेश आहे.


बदली प्रक्रियेत प्रशासक वर्षा ठाकूर घुगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे , ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे , माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर , प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर यांच्यासह गट शिक्षण अधिकारी यांची उपस्थिती होती .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)