नादेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मारतळा। दिनांक 31 मे 2022 आज सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या असल्या तरी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी ऑनलाइन क्लास च्या माध्यमातून दिनविशेष या सदराखाली जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने मुलांना तंबाखू मुळे होणारे दुष्परिणाम व गावातील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या सर्वांचे व्यसन सोडवण्यासाठी आपल्याला करावयाचे आहे कार्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
मुलांची तंबाखूमुक्त या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या सुंदर चित्र काढणाऱ्या युवराज तर्फेवाड ,दिव्या लोंढे, अभिजीत लांडगे यांना बक्षीस जाहीर केले .सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या असल्या तरी मुलांशी असणारा संवाद बंद न होऊ देता ऑनलाइन पद्धतीने नियमितपणे अभ्यास सुद्धा मुलांना ढगे सर पाठवत आहेत. त्यामुळेच तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने माझे कुटुंब तंबाखूमुक्त कुटुंब हे अभियान मुलांच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्धार केला असून यात मुले गावातील प्रत्येकाच्या घरी भेट देऊन घरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या लोकांची संख्या जाणून घेऊन त्यांना तंबाखूजन्य पदार्थामुळे होणारे नुकसान त्याचा आपल्या कुटुंबावर होणारा परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच ज्या कुटुंबातील सदस्य या अभियानाअंतर्गत तंबाखूजन्य पदार्थ खाणे सोडणार आहेत त्यांचा शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी यथोचित सन्मान करण्यात येणार आहे . सदरील उपक्रमामुळे मुलांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे आरोग्यास हानिकारक आहे त्यामुळे विविध आजार आपल्याला होऊ शकतात यातून आपला प्राणही जाऊ शकतो हे समजण्यास प्रत्यक्षात मदत होणार आहे. सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज तर्फेवाड,साक्षी तर्फेवाड, वैष्णवी डोंगरे, सचिन तर्फेवाड ,साक्षी पुणेबाईनवाड , माधुरी मेटकर, अभिजित लांडगे संस्कृती येडे आदी विद्यार्थी परिश्रम घेणार आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .