लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेसाठी जमा केले तब्बल साडेपाच लाख

शालेयवृत्त सेवा
1

 




भीमला तांडा येथील ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम 


नांदेड (शालेय वृत्तसेवा) :

आपली मुले शिकली पाहिजे त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाच्या निधीची प्रतीक्षा न करता लोहा तालुक्यातील भिमला तांडा (गोविंद तांडा ) येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्गखोली बांधकामासाठी जागा उपलब्ध नव्हती ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती गावकरी यांनी पुढाकार घेऊन तब्बल साडेपाच लाख रुपयांचा निधी लोकवर्गणीतून जमा केला आणि शाळेसाठी जमीन खरेदी केली. 



यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व समिती सदस्य शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे शिक्षक यांच्या प्रयत्नातून यश मिळाले आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाब जाधव , उपाध्यक्ष पंडित राठोड , नामदेव पवार , पोलीस पाटील शेषराव जाधव, नागोराव चव्हाण, गोविंद महाराज , वसंत जाधव , पंडित रामा राठोड , बालाजी राठोड , रामदास राठोड , भीमराव राठोड , चंदू चव्हाण, शंकर राठोड , गुलाब चव्हाण , नारायण चव्हाण, बाबाराव जाधव, दादा पवार , मुख्याध्यापक सय्यद , शितोळे , वाडेकर , शिंदे आदींनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा