शिक्षक परिषदेचे दोन वर्षांपासून आंदोलनाची यशस्वी सांगता !
अहमदनगर ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषदेमध्ये मागील दोन वर्षापासून प्रलंबित असलेली वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर होत नव्हते त्यासाठी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने आंदोलनाचे हत्यार उपसले होते परंतु या आंदोलनामध्ये यशस्वी तडजोड करण्यासाठी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे व परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर त्याचप्रमाणे शिक्षक परिषदेचे राज्य नेते रावसाहेब रोहोकले यशस्वी झाले. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्व प्रलंबित वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांबोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याबरोबर यशस्वी चर्चा झाली होती.
22 मे दोन 2022 रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजुरीसाठी कमिटीची बैठक आयोजित केली होती. रोहोकले यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजुरी ची फाइल अंतिम टप्प्यात असून फक्त आपली स्वाक्षरी बाकी आहे असे जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांना सांगितले तेव्हा त्यांनी तात्काळ त्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी पात्र प्राथमिक शिक्षकांच्या प्रस्तावांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरी दिली.
मागील दोन वर्षापासून प्रलंबित वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याबद्दल अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रवीण ठूबे , राज्य उपाध्यक्ष संजय शेळके , नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाये , उच्चाधिकार समिती अध्यक्ष आरती राहणे , महिला आघाडी अध्यक्षा मीनाक्षी तांबे भालेराव, विभागीय उपाध्यक्ष आबासाहेब पवार , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र पटेकर , कार्याध्यक्ष राम निकम , सरचिटणीस दत्ता गमे , गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे , श्रीकृष्ण खेडकर , राजूभाई इनामदार आदी शिक्षक परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .