विभागीय आयुक्तालय समोर ३० मे रोजी धरणे..
औरंगाबाद (शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मागील बारा वर्षापासून शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख याशिवाय सात वर्षापासून मुख्याध्यापक पदवीधर शिक्षकांची पदोन्नती रखडली आहे. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत अनेक सेवानिवृत्त झाले. परिणामी पदोन्नतीची संधी हिरावली जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जी प्रशासन दिरंगाई करीत असल्याने संतप्त शिक्षक संघटनांनी आता 30 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे . यासंबंधीचे निवेदन शिक्षक संघटनाच्या समन्वय समितीने नुकतीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना सादर केले आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदवीधर शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून ते पदोन्नती द्वारे भरलेली नाही. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सर्वच संघटनांनी प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. संघटनाच्या समन्वय समितीला प्रशासनाने चर्चेसाठी बोलाविले दोन महिन्यात शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन प्रशासनाने शिक्षकांची बोळवण केली.
त्यामुळे आता संतप्त शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. समितीने कळविले विस्ताराधिकारी पदोन्नतीसाठी पात्र शिक्षकांना बारा वर्षापासून वंचित ठेवले आठ वर्षापासून पदवीधर विज्ञान विशेष शिक्षकांची सुमारे 300 पदे भरलेली नाहीत. केंद्रप्रमुख यांची 90 पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापकांची शंभरपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत आहे.
या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात यावी दोषी असलेल्या शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी विरुद्ध कारवाई करण्यात यावी. पदोन्नतीपासून वंचित शिक्षकांना न्याय द्यावा नियमित वेतन श्रेणी कर्मचारी कल्यान निधी धारकांचा हिशोब द्यावा आधी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 30 मे रोजी सोमवारी सकाळी 12 ते 5 यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समन्वय समितीच्या वतीने धरणे दिले जाणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .