डॉ.सतीश पाटील, डॉ. राजकुमार राठोड, श्री बाबाराव डोईजड, श्रीमती विजया पाटील यांचे 'व्यसनमुक्त पहाट ' पुस्तकाचे बाराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत प्रकाशन ।

शालेयवृत्त सेवा
0




मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई च्या वतीने बारावी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण या विषयावर आयोजित करण्यात आले होते. या परिषदेच्या दुपारच्या सत्रात शिक्षण व व्यसनमुक्ती चळवळीत कार्य करणारे शिवछत्रपती राज्य युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असणारे डॉ. सतीश पाटील, डॉ. राजकुमार राठोड, बाबाराव डोईजड, श्रीमती विजया पाटील या लेखकांनी लिहिलेल्या व्यसनमुक्त व तंबाखू मुक्त शाळा चळवळीला बळकटी देणारे पुस्तक व्यसनमुक्त पहाट चे प्रकाशन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे, एम के सी एल चे प्रमुख विवेक सावंत, शिक्षण विकास मंचच्या वसंती राॅय यांच्या हस्ते खासदार शरदचंद्रजी पवार, हेमंत टकले, कुराडे सर,डॉ.वसंतराव काळपांडे, डॉ.माधव सूर्यवंशी, डॉ. अनिल काकोडकर,खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

     

       समिक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांनी प्रकाशित केलेल्या व डॉ.सतीश पाटील, डॉ.राजकुमार राठोड, श्री.बाबाराव डोईजड‌, श्रीमती विजया पाटील या लेखकांनी लिहिलेल्या व्यसनमुक्त पहाट या पुस्तकाचे मान्यवरांनी प्रकाशन करून व्यसनमुक्ती चळवळीला गतिशील करणाऱ्या या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. या पुस्तकात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम व व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार कार्यक्रम, उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक चळवळ बनत आहे यावर अभ्यासपूर्ण माहिती द्वारे प्रकाशझोत टाकलेला आहे.



  व्यसनमुक्त पहाट या पुस्तकात विविध उपक्रमात नवनवीन ज्ञान नवे विचार, संकल्पना, निकष पूर्तता,उपक्रमशीलता, सर्जनशीलता विकसित करण्यासाठी ही चळवळ उपयुक्त आहे, तसेच जनजागृतीसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. व्यसनमुक्त समाजाची संकल्पना खऱ्या अर्थाने साकार होण्यासाठी सदर पुस्तकाची मदत होऊ शकेल. व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी येणारे संकट, धूम्रपान धोक्याची-घंटा कारणे व उपाय, व्यसनाची लक्षणे व अमली पदार्थ विरोधात कायदा, मानसिक ताण तणाव व्यवस्थापन व दृष्टीक्षेप, व्यसनमुक्त चळवळ लोकचळवळ व्हावी, मौखिक आरोग्य, तंबाखू नियंत्रण कायदा 2003, तंबाखू मुक्त शाळा उपक्रम निकष, ई सिगारेट, व्यसनमुक्त चळवळ गतिमान व्हावी आणि अनेक महत्त्वपूर्ण विषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे.


     व्यसनमुक्त पहाट हे पुस्तक व्यसनमुक्ती चळवळीला बळकटी आणणारे असून त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. सदर पुस्तक संशोधनास पूरक व मार्गदर्शक ठरेल असे आहे. लेखक डॉ. सतीश पाटील, डॉ.राजकुमार राठोड, श्री.बाबाराव डोईजड, श्रीमती विजया पाटील यांच्या लेखणीतून व्यसनमुक्त पहाट हे पुस्तक जनजागृती व प्रबोधनास उपयुक्त ठरणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)