पुणे (शालेय वृत्तसेवा) :
बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अजूनही काही दिवस लांबणार असल्याने समजते.वरिष्ठ व निवड श्रेणी ट्रेनिंग 14 मे पासून सुरू होण्याची माहिती scert ने दिली होती.
परंतु आज घेतलेल्या माहितीवरून ट्रेनिंग चे update आणि इतर संबंधित सर्व माहिती अजून पोर्टल वर अपलोड नाहीय.ती पुढील पाच दिवसांत अपलोड केली जाईल. त्यानंतर review व testing होईल आणि मग पोर्टल सुरू होईल. संबंधित गोष्टीसाठी 10 ते 12 दिवस लागू शकतात तरी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांनी चिंता करू नये.
Scertट्रेनिंग बाबत update, password आणि लॉगिन id आपल्याला आपल्या मोबाईल no वर आणि इमेल वर पाठवणार आहे तरी पुढील काही दिवस आपला इमेल चेक करत राहावे.
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोत यांचेकडून मिळालेली आहे कदाचित त्यात बदल होऊ शकतात)
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .