मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्यावतीने वरीष्ठ / निवड श्रेणीसाठी आँनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या संदर्भात विविध समाज माध्यमातून प्रशिक्षणाची दिशाभूल करणारी माहिती येत आहे.
सदर प्रशिक्षणाबाबत शालेय शिक्षण विभागाने इच्छुक शिक्षकांची माहिती संकलित केली आहे. 94000 हजार शिक्षकांनी या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. या प्रशिक्षणाची तयारी करण्याचे काम इन्फोसिस या जगप्रसिद्ध आस्थापनाकडे देण्यात आले आहे.
शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणा अभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी इन्फोसिस मार्फत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.अशी माहिती दिली आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) आणि इन्फोसिस यांच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड आणि सचिव रणजित देओल यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला मे महिन्यातील सुट्टीत हे प्रशिक्षण होणार आहे.
सदर प्रशिक्षणिबाबत शिक्षण विभागाने योग्य ती वस्तुस्थिती शिक्षकांसमोर आणावी व शिक्षणामध्ये असलेला संभ्रम दूर करावा अशी मागणी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शाळेच्या एका शिक्षकाने शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड व संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.
प्रशिक्षण वेळ, दिनांक तसेच लाँगिन आयडी व योग्य ती तांत्रिक माहिती देण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकांनी समाज माध्यमातून येणार्या वेगवेगळ्या लिंक व वॅटसअँप ग्रुपवर आपली कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देऊ नये केवळ शिक्षण विभागाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे असे सुचवण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या शाळांतील शिक्षकांची यादी जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .