अर्जित रजेच्या रोखीकरण बाबत शिक्षक मुख्याध्यापकात संभ्रम ... शिक्षकांना अपेक्षा !

शालेयवृत्त सेवा
0

 



औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन सरंचेनुसार करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत बुधवारी दिनांक 4 मेचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला. अर्जित रजेचा लाभ फक्त मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिला जातो परंतु शासनाने काढलेल्या आदेशामध्ये शिक्षकांना सुधारित वेतनानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे.


अर्जित रजेचे रोखीकरण करण्यासाठी 240 दिवसाची मर्यादा 300 दिवसापर्यंत वाढवली आहे सदर आदेश राज्यातील खासगी मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला. वित्त विभागाने 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना लागू केली आहे त्यानुसार राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना लागू केले आहे. त्यानुसार अर्जित रजा देय असलेल्या कर्मचाऱ्या बाबत सुधारित वेतन सरांचं येथील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिक्षक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाचे सममूल्य रोख रक्कम रोखीने प्रदान करण्यात येणार आहे. 


अर्जित रजेचा लाभ केवळ मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिला जातो शिक्षकांना अर्जित रजेचा लाभ दिला जात नाही परंतु या आदेशामध्ये मुख्याध्यापकांचे नाव नसल्यामुळे तसेच शिक्षकांचा उल्लेख केल्यामुळे मुख्याध्यापक शिक्षकांचा गोंधळ उडाला आहे. 2019 मध्ये वित्त विभागाने आदेश काढून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे अर्जित रजेचे रोखीकरण करावे असे सूचित केले होते परंतु काही जिल्ह्यात वेतन वितरण पथक अधीक्षकांनी शासन निर्णय जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत सहाव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरणाची देयके मंजूर करू असे म्हटले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)