लोणावळा येथे झालेल्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सातपुड्यातील भगतसिंग रामसिंग वळवी यांने ५० किलोमीटर गटात प्रथम क्रमांक पटकावला...७५ हजार रुपये रोख पारितोषिक

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील असली गावचा रहिवासी भगतसिंग रामसिंग वळवी याने लोणावळा पुणे येथे झालेल्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत ५० किलोमीटर गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. रात्री सकाळी 1 वाजता सुरू झालेल्या या टाटा अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये ५० किलोमीटर अंतर तीन तास 18 मिनिट वेळेत आपली दौड पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आयपीएस कृष्ण प्रकाश यांनी भगतसिंग वळवी यांना सन्मानचिन्ह व ७५ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरव करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 


भगतसिंग सोबत धडगाव तालुक्यातील आणखी दोन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. 35 किलोमीटर गटात उदेसिंग पाडवी यांनी दोन तास ते 30 मिनिटात आपली दौड पूर्ण करून द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. त्यांना दहा हजार रुपये रोख पारितोषिक बक्षीस देण्यात आले आहे. तर धडगाव तालुक्‍यातील दारासिंग पावरा या विद्यार्थ्यांने 35 किलोमीटर गटाचे अंतर तीन तास तीन मिनिटात पूर्ण करत सातव्या स्थानावर समाधानकारक कामगिरी बजावली आहे. 


सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असलेल्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवून विजेतेपद पटकावून सातपुडाचे नाव उंचावले आहे. या विद्यार्थ्यांना साक्री तालुक्यातील अंकेश कुवर विप्रो कंपनी मुंबई. मनोज गावित राहणार चितवी, नवी मुंबई पोलिस यांनी मोलाचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य केले आहे. भगतसिंग वळवी यांनी याआधी अहमदाबाद, बडोदा, मुंबई, लोणावळा, पुणे या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धामध्ये सहभाग घेऊन एक उत्कृष्ट धावपटू म्हणून कामगिरी बजावली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)