दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतु अभ्यासक्रमाची निर्मिती
पुणे (शालेय वृत्तसेवा) :
कोरोनामुळे सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले हे नुकसान भरून काढण्यासाठी यंदादेखील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतु अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात जून महिन्यात विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यात येणार असून त्यानंतर चाचणी घेण्यात येणार आहे अशी माहिती विद्या प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनामुळे दोन वर्षात शाळा कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन सुरू राहिल्या त्यामुळे दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य झाले नाही.
अर्धवट मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्यात आले विद्यार्थी पुढील वर्गात गेले असले तरी विविध विषयांमधील महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी तसेच मागील घटकांमधील संकल्पना ची उजळणी करण्यासाठी शेतू अभ्यासक्रमाची निर्मिती डायट च्या माध्यमातून विद्या प्राधिकरण स्तरावर सुरू आहे .
सेतु अभ्यासक्रमाचा फायदा
अँड्रॉइड फोन इंटरनेटचे अपुरी सुविधा यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतु अभ्यासक्रमाचा फायदा चांगला होणार आहे राज्यातील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षी नव्याने सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून तो शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस संपूर्ण एक महिना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .