नागपूरसह राज्यभरात शिष्यवृत्ती अर्ज मोठ्या प्रमाणावर पेंडिंग
नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्य शासनातर्फे पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यासाठी विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. शिष्यवृत्तीसाठी आता विद्यार्थ्यांना बँक केवायसी अत्यावश्यक झाले आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारले जात नाहीत.
दरम्यान नागपूर जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयीन स्तरावर पेंडिंग असल्याची बाब उघडकीस आली आहे. संदर्भात समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना तातडीने अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यापैकी बहुतांश अर्ज हे आधार अपडेट केवायसी नसल्याचे सांगितले जाते. नागपूरसह राज्यभरात शिष्यवृत्ती अर्ज मोठ्या प्रमाणावर पेंडिंग आहेत आता शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत परंतु ते सुद्धा वेळेवर भरले जात नाहीत. मागच्या वर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी आतापर्यंत अर्ज भरले जात असल्याची बाब दिसून आली आहे.
कोण कोणत्या शिष्यवृत्ती दिल्या जातात :
भारत सरकारचे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना दिली जाते या योजनेअंतर्गत अकराव्या वर्गापासून पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासोबतच राज्य शासनातर्फे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयीन स्तरावर मोठ्या प्रमाणावर पेंडिंग असल्याने सामाजिक न्याय विभागाने याची अतिशय गंभीर दखल घेतली आहे. महाविद्यालयांना यासंदर्भात वारंवार सूचना करण्यात आली आहे यानंतरही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित राहावे लागले तर संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही विभागाने दिला आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .