मुंबई (शालेय वृत्तसेवा) :
राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या मोठ्या बांधकामासाठी 75 कोटी 24 लाख रुपयाचा निधी मिळणार आहे यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा पूर्वीच्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या 81 शाळा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शासकीय विद्यानिकेतन व नागरी भागातील शाळा यांचा समावेश करून 488 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय झाला आहे. यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक 267 शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक 62 शाळा अशा एकूण 355 शाळांच्या बांधकामांना 53 कोटी 97 लाख 15 हजार इतका निधी वितरित केला आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .