महाराष्ट्र दिनी नागपूरात संविधानाचा जागर..

शालेयवृत्त सेवा
0

 



नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष, ६२ वा महाराष्ट्र दिवस आणि जागतिक कामगार दिवसाच्या निमित्ताने संविधान फाऊंडेशनच्या वतीने १ मे २०२२ रोजी सायंकाळी नागपूरातील संविधान चौकात संविधान वाचन करण्यात आले.


राष्ट्राची एकता आणि एकात्मतेसाठी बंधुभाव प्रवर्धित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सद्या देशात, जाती धर्मावरून माणसामाणसात द्वेष निर्माण करण्याच्या प्रयत्न होत आहे. तेव्हा, समानता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाच्या तत्वानुसार माणसे जोडण्याचा संकल्प होणे गरजेचे आहे. प्रेम, मैत्री, करुणा या शाश्वत मूल्यांचा जागर होऊन बंधुभावाचा भारत निर्माणासाठी हे एक पाऊल आहे. या अनौपचारिक कार्यक्रमात नागरिकांनी विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. संविधान फाऊंडेशनचे संस्थापक व माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)