शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांचे उल्लेखनीय कार्य.. अधिकाऱ्यातील माणुसकी ! रस्त्यावरच्या मुलांना दाखवला जीवनाचा मार्ग. !

शालेयवृत्त सेवा
0

 




[ शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला आहे आमचे मुंबईचे विशेष प्रतिनिधी उदय नरे यांनी ]


आपण नेहमीच रस्त्यावरून प्रवास करतो. अचानक गाडी सिग्नलला थांबते. गाडीच्या काचेवर टकटक आवाज येतो. कधी आपण काच खाली करतो, आपल्या आपल्यापरीने मदत करतो तर कधी काच खाली न उघडतात कुत्सित नजरेने पाहिले जाते. 


अनेकदा सिग्नलवर ती भीक मागणारी मुले आपण पाहतो तर कधु हातात  गुलाबाची फुले, पेन, व इतर तत्सम साहित्य विकणारी मुले आपण पाहिली असतील.  परंतु ती मुलं कोण आहेत? कुठून आलीत? त्यांचे जीवन कसे आहे? कशी जगत असतील ही मुले, त्यांचे पालक काय करतात? त्यांचे काम काय? त्याचं जीवन काय? असा साधा प्रश्न आपल्या मनाला भेडसावत नाही. मुंबईतील शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवे असेच एकदा रस्त्यावरून मंत्रालय एका बैठकीत जात होते. बैठकीचे विचारसत्र डोक्यात सतत चालू असताना त्याची गाडी सिग्नल जवळ थबकते. 


 त्यांच्या नजरेस पडतात ती गरीब आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी फुले विकणारी ती मुले त्यातील एका मुलाने  सरांच्या  गाडीच्या काचेवर टकटक केली परंतु त्याच टकटकीने त्या मुलांच्या जीवनातील दरवाजे उघडले कारण ते काच नव्हती तर त्यांच्या जीवनाचा आरसा होता या गाडीमध्ये बसले होते ते मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक श्री संदीप संगवे सर. अत्यंत मितभाषी, आपल्या विषयाचे ज्ञान असणारे व कार्यक्षम अधिकारी श्री. संदीप संगवे सर. अशीच यांची आज मंत्रालयात व शिक्षण विभागात ओळख आहे. शिक्षण उपसंचालक झाल्यापासून शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक विद्यार्थी यांचा त्यांचाही नेहमी संपर्क येत असतो. मुंबईतील कामाचा व्याप पाहता सर्वांनाच वेळ देणे शक्य नसते परंतु येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे स्वागत करून त्यांची समस्या तात्काळ दूर करण्याचे कार्य कोण करत असेल तर शिक्षण अधिकारी संदीप संगवे सर. 


शाळेचा प्रवेश फी माफीचा प्रश्न असो, शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न असो, शिक्षण विगातील कोणत्याही समस्या, प्रशिक्षण यि संदर्भातील  प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असलेले संदीप संगवे सर सहज उपलब्ध होतात.  अर्जदार, तक्रारदार यांच्या समस्या दूर करतात, म्हणून एखाद्या राजकारणी सेलिब्रिटी प्रमाणेच त्यांचे व्यक्तिमत्व ही सर्वांना परिचित झाले. समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक शिक्षक,  विद्यार्थी व पालक यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे राज्यातील अनेक पत्रकारांशीही त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. रस्त्यावर भीक मागून पोट भरणारी ही मुलं आहेत पाहिल्यावर त्यांचे लोण्हूयाहून  मऊ असलेल्या मनानी मुलांची चौकशी केली.


 विठ्ठल भक्त असलेले संदीप संगवे मुलांची आस्थेने चौकशी केली.  आपली गाडी  बाजूला लावली आणि त्या गरीब मुलांशी संवाद साधला त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की ही मुले शाळेतील शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यास मुलांसाठी शोधमहीम शासन राबवते.  शाळेतील शिक्षक हे काम करत असतात आणि त्याचा अहवाल शिक्षण अधिकारऱ्यांकडे देत असतात. सामाजिक जाण असलेले संदीप सर अधिकार्‍याने स्वतःहून शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य केले. शाळा बाह्य असलेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम या मुलांना शाळेचे महत्त्व समजावून सांगितले गरीब मुले असल्यामुळे घरी राहण्याची खाण्याची आबाळ होत होती यासाठी त्यांनी महापालिकेच्या वस्तीगृहात या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली शाळा पूर्वतयारी अभियानात या मुलांना त्याने सहभागी करून घेतले.


 शिक्षण अधिकारी कार्य करत आहेत हे पाहून संबंधित कर्मचारी, इतर अधिकारी तात्काळ कामाला लागेल त्या मुलांचा कोणत्या समस्या  आहेत, त्या मुलांचे पालक कोण? या मुलांसाठी काय करता येईल याची  माहिती गोळा केली मुंबईच्या मायानगरीत परराज्यातून उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान तामिळनाडू, बिहार राज्यातील अनेक कामगार येत उदरनिर्वाहासाठी येत असतात. येताना त्यांची मुलेही त्यांच्यासोबत असतात.यांच्या शिक्षणाची आबाळ होत असते या सर्वांच्या शिक्षणाचा प्रश्न उच्चपदस्थ अधिकारी व समाजमनाची जाण असणाऱ्या सरांनी जाणली.नजरेला नजर भिडली पडली आणि डोळ्यात अश्रू आले . या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून रस्त्यावर फुले विकणाऱ्या मुलांच्या जीवनात नंदनवन फुलवण्याचे कार्य नक्कीच स्पृहणीय व कौतुकास्पद आहे. .   


 शालेय शिक्षण विभाग महिला बाल विकास समितीच्या साहाय्याने सायनमधील मानव सेवा संघ आणि महालक्ष्मी येथील वात्सल्य फाऊंडेशनच वसतिगृहामध्ये राहण्याची व जेवणाच व्यवस्था केली. मुलांच्या राहण्या खाण्याची सोय झाल्याने तसेच त्यांन शाळेतही पाठवण्यात येणार असल्या त्यांच्या पालकांकडून समाधान व्यक करण्यात आले. या मुलांच्या निवासाच व्यवस्था केल्यानंतरही ते वसतिगृहा व्यवस्थित राहत आहेत का, त्यांन काही अडचणी येत आहेत का, याच माहिती घेत संगवे सर पाठपुरावा करत आहेत. केले तर सहज शक्य आहे. पण इच्छा शक्ति पाहिजे हेच शिक्षण उपसंचालक संदिप संगवे सरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. 


उदय नरे / मुंबई

विशेष प्रतिनिधी ' शालेयवृत्त '


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)