राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रश्न‌सोडविण्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले निवेदन..

शालेयवृत्त सेवा
0



संघटना पदाधिकारी यांची मंत्रालयात बैठक  आयोजित करण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आश्वासन . !


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी निवेदन देऊन ही प्रश्न निकाली निघत नसल्याने संघटनेचे राज्याध्यक्ष  सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन देऊन त्यावर चर्चा केली आहे.या प्रश्नाचे निवेदन ग्रामविकास मंत्री यांनी ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्या तात्काळ पाठवून संबंधित प्रश्नावर कार्यवाही करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक  आयोजित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 


ग्रामविकास मंत्री यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणे, इतर पुरस्कार प्राप्ताप्रमाणे  राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मोफत रेल्वे व बस पास सवलत देण्यात यावी. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदोन्नती मध्ये प्राधान्य देऊन १०टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात ,जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा समावेश संवर्ग १मध्ये करण्यात यावा. राज्य व जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांवर  या शिक्षकांची निमंत्रित सदस्य म्हणुन नियुक्ती करावी.


 इतर राज्यात देण्यात येणाऱ्या सुविधा या शिक्षकांना देण्यात याव्यात .यासह आदि मागण्याचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री यांनी या प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली असुन हे प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.यावेळी खासदार सुनिल तटकरे, युवासेना विस्तारक  दिलीप घुगे  राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर, राज्य सरचिटणीस अनंता जाधव,राज्यकार्याध्यक्ष  दशरथ शिंगारे ,पुणे जिल्हाध्यक्ष भिमराव शिंदे ,राज्य उपाध्यक्ष संभाजी ठुबे यासह आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)