एक जून पर्यंत अर्ज दाखल करता येणार
नाशिक (शालेय वृत्तसेवा) :
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 21 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा आज करण्यात आले. त्यानुसार 161 पदावरील भरती करिता राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तारीख 12 पासून सुरू होत असून 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022ची जाहिरात आयोगातर्फे बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली नुकताच 2020 च्या राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती तर 2021 च्या राज्यसेवा परीक्षेची प्रक्रिया देखील सुरू आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे या परीक्षा विलंबाने होत असताना नववर्षातील वेळापत्रकाचे पालन होण्याच्यादृष्टीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. दरम्यान तिच्या पात्रतेची अट आयोगातर्फे जाहीर केलेली असल्याने या बदलानुसार यंदाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
मुख्य परीक्षा जानेवारीत
पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल हे मुख्य परीक्षा 21 ते 23 जानेवारी 2023 किंवा त्यानंतर घेण्याचे नियोजन असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परिपत्रकात नमूद केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .