विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून मिळणार पौष्टीक आहार

शालेयवृत्त सेवा
0

 




अमरावती ( शालेय वृत्तसेवा ) :

गेल्या काही महिन्यापासून विद्यार्थ्यांना कोरडा शिधा मिळत असून आता शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शिजवलेली खिचडी दिली जाणार आहे या करता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जून महिन्याच्या तांदळासह धान्यादी मालाचा वितरणाला सुरुवात झाली असून त्याच्या शाळास्तरावर पुरवठा केला जात आहे त्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाकडून सूचना दिल्या आहेत.


मध्यान्ह भोजन योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 2008-09 मध्ये सुरु झाली. कोरोना पूर्वी शालेय पोषण आहार अंतर्गत मध्यान्ह भोजन राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांना पोस्टीक खिचडी शिजवून देण्यात होते मात्र या कालावधीत शाळांचा बंद असल्याने विद्यार्थ्यांना दर महिन्याचा तांदूळ आणि कडधान्य असा कोरडा सीधा देण्याचा निर्णय झाला होता .



सध्या शाळांना सुट्ट्या आहेत परंतु जून महिन्याच्या पोषण आहाराचा पुरवठा तत्पूर्वी करण्यात येणार आहे त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासून पोस्टीक खिचडी मिळणार आहे. 

- स्वप्निल सुपासे (लेखाधिकारी शालेय पोषण)



शिजवून तयार करावयाच्या आहार :

सोमवार - तूर डाळीचे फोडणीचे वरण भात 

मंगळवार - मटकी उसळ व भात 

बुधवार - हरभरा उसळ व भात 

गुरुवार - मुग डाळ फोडणीचे वरण व भात 

शुक्रवार - मटकी उसळ व भात 

शनिवार हरभरा उसळ

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)