शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी सन २०२२-२३ या कालावधीसाठी खालील प्रमाणे Key Result Area (KRA - मुख्य परिणाम क्षेत्र) उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असुन राज्याला राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे व दहावी पर्यंत मुलींच्या गळतीचे प्रमाण खाली आणणे, विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे, विद्यार्थ्यांची आधार जोडणी करणे तसेच शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे त्याचप्रमाणे राज्यात सर्वोत्तम खेळाडू तयार करण्यासाठी सुविधा निर्माण करणे इत्यादी प्रमुख उद्दिष्टे आहेत.
ही उद्दिष्टे साध्य करण्याकरिता राज्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम आखण्यात आला असून त्यानुसार प्राथमिक स्तरासाठी दि. २२ जून, २०१५ व माध्यमिक स्तरासाठी दि. १६ सप्टेंबर, २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच खेळाडू साठी क्रीडा विज्ञान केंद्र, बालेवाडी, पुणे व महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे या सारख्या संस्था विकसित करण्यात येत आहेत. या विभागाच्या KRA अनुसार दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियोजनबध्द व काटेकारपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
काय आहे उद्धीष्टे :
१. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत (Learning Outcomes) मध्ये १० टक्केने वाढ करणे. (एसडी-६)
२.School MIS प्रणालीचे विकसन करुन ते User Acceptance Testing (UAT) च्या टप्प्यापर्यंतचे काम पूर्ण करणे. (एसडी-१)
३. शासकीय, अनुदानित व आरटीई अंतर्गत २५ टक्के शुल्क प्रतीपुर्तीचा लाभ घेण्याऱ्या खाजगी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आधार जोडणी व वैधता पूर्ण करणे. (एसडी-१)
४. Command Control Center (CCC) कार्यान्वित करणे. (एसडी-६)
५. BISAG द्वारे १२ शैक्षणिक Channel सुरु करणे. (एसडी-६)
६. इयत्ता १ली ते इयत्ता १२वीचा e-content विकसित करणे. (एसडी-६)
७. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन प्रदानासाठी CMP प्रणाली लागू करणे.
८. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी च्या शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी Learning Management System विकसित करुन जवळपास ९४००० शिक्षकांना प्रशिक्षण देणे. (प्रशिक्षण)
९. Performance Grading Index (PGl) मध्ये ५० गुणांनी वाढ करणे. (एसडी-६)
१०. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, पुणे येथे सुरु करणे. (क्रीडा-१ )
११. भविष्यातील सर्वोत्तम खेळाडूंसाठी/ athlets घडविणे आणि त्यांच्या कामगिरीत वाढ करण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट क्रीडा विज्ञान केंद्र बालेवाडी, पुणे येथे विकसित करणे. (क्रीडा-१)
१२.समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर आराखड्यानुसार निधीचा विनियोग करणे. (एसडी - १ )
१३. स्टार्स प्रकल्पांतर्गत मंजूर आराखड्यानुसार निधीचा विनियोग करणे. (एसडी-६)
१४.मध्यान्ह भोजन अंतर्गत मंजूर आराखड्यानुसार निधीचा विनियोग करणे. (एसडी - ३)
१५. विभागाचा व अखत्यारीतील कार्यालयांचा आकृतिबंध मंजूर करणे. (प्रशा-५)
१६. विभागाचा व अखत्यारीतील कार्यालयांचा वाहन आढावा घेणे. (प्रशा-५ )
वरील KRA उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना या परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येत आहेत की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या अनुषंगाने योग्य ती नियोजनबध्द कार्यवाही करावी. तसेच याबाबतचा मासिक प्रगती अहवाल नियमितपणे आयुक्त (शिक्षण) यांना सादर करावा. आयुक्त, शिक्षण व आयुक्त, क्रीडा यांनी उपरोक्त उद्दिष्टांच्या अनुषंगाने जिल्हानिहाय आढावा वेळोवेळी घेऊन शासनास अहवाल सादर करावा. तसेच प्राप्त अहवाला नुसार सर्व संबंधित कार्यासनानी पुर्ततेबाबतचा मासिक अहवाल शासनाच्या KRA प्रणालीवर अद्ययावत करण्याची कार्यवाही करावी.
[ सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनांच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२०५२३१६०२२३८६२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उपसचिव, महाराष्ट्र शासन ]
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .