युट्युब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण !
क्रिकेटचा ठाणे जिल्हाचा संघ खेळणार राज्यस्तरावर !
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचा उपक्रम !
ठाणे (भिवंडी- वार्ता) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ हि शिक्षकांच्या साहित्य कला व क्रीडा गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी नोंदणीकृत संस्था आहे. कोविड काळात साहित्य व कला क्षेत्राशी संबंधित मासिक व विविध स्पर्धा जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर online आयोजित केल्या जात आहेत. मात्र कोविड काळातील बंधने व धोके लक्षात घेता मागील दोन वर्षे क्रीडा स्पर्धा आयोजित करता आल्या नव्हत्या . कोविडची बंधने शिथिल होताच मंडळाने संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या स्पर्धा घेण्याचे नियोजन केले . त्यानुसार कोकण विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
केवळ कार्यरत शिक्षकांसाठी असलेल्या या स्पर्धांचे उद्धाटन मा. अविनाश मोहिते ( सहाय्यक गट विकास अधिकारी व खेळाडू ) यांच्या शुभ हस्ते भिवंडीती चॅलेंज ग्राउंडवर करण्यात आले. यावेळी संस्थापक राज्याध्यक्ष मा, नटराज मोरे , राज्य तंत्र निर्देशक श्री. अलंकार वारघडे , कोकण विभागीय अध्यक्ष सौ. हर्षल साबळे , विभागीय सल्लागार श्री अशोक ठाणगे, कोकण विभाग क्रीडा प्रमुख श्री. संतोष जोशी , श्री. अमित आदवडे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी , श्री विवेक कुवरा जिल्हाध्यक्ष पालघर , सौ. विद्या शिर्के ठाणे जिल्हाध्यक्ष , क्रीडाप्रेमी व स्पर्धक उपस्थित होते.
या महोत्सवात धावणे , बुद्धिबळ , पोहणे व क्रिकेट स्पर्धांचा सहभाग होता. पोहण्याची स्पर्धा कल्याण येथील वायले स्पोर्ट्स क्लब येथे घेण्यात आली. नगरसेवक मा.श्री.वायले यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. तर इतर सर्व स्पर्धा चॅलेंज ग्राउंड व जिमखाना येथे घेण्यात आल्या. दिवसभरात ह्या स्पर्धांना भिवंडीतील अनेक क्रीडाप्रेमी व मान्यवरांनी भेट दिली . ह्या स्पर्धांचे युट्युब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले.
चुरशीच्या झालेल्या विभाग स्तरीय क्रिकेट सर्धेत ठाणे जिल्हा संघाने अंतिम विजेते पद पटकावले तर पालघर संघास उपविजेतेपद मिळाले. पालघर संघाचे डावखुरे फलंदाज श्री. विनोद गुंड सर यांना मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
100 मीटर धावण्यात सौ. निकेता गोस्वामी – पालघर प्रथम , सौ. अर्चना वारघडे,ठाणे द्वितीय व सुरेखा ताजवे ठाणे-तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या . २०० मीटर धावण्यात श्री. कल्पेश बोटके रत्नागिरी – प्रथम , श्री. मनोहर नम पालघर द्वितीय तर योगेश किणी पालघर यांनी तृतीय क्रमांक पटकावला .
बुद्धिबळ – आनंद राऊत- पालघर प्रथम , मनीष रावल रत्नागिरी द्वितीय , किशोर मांगले पालघर तृतीय तर महिलांमध्ये निकेता गोस्वामी – प्रथम , सुरेखा ताजवे द्वितीय तर अर्चना वारघडे तृतीय आल्या . पोहण्याच्या स्पर्धेत श्री. मुबस्सीर मो. अली मुल्ला रत्नागिरी- प्रथम , मुस्तकीन निसार पटेल रत्नागिरी- द्वितीय तर श्री. नंदन चौधरी पालघर यांनी तृतीय क्रमांक पटकावला . धावते समालोचन श्री. अमित आदवडे – रत्नागिरी , श्री. गणेश गायकवाड ठाणे व श्री. प्रशांत तुपे ठाणे यांनी केले. पारितोषक वितरण समारंभास चॅलेंज स्पोर्ट्सचे श्री पप्पू चौधरी व श्री. संतोष चव्हाण उपस्थित होते. मंडळाचे राज्याध्यक्ष श्री नटराज मोरे, राज्य तंत्रनिर्देशक श्री अलंकार वाराघडे, कोकण विभागीय अध्यक्ष सौ.हर्षल साबळे, विभागीय क्रीडा प्रमुख श्री संतोष जोशी, यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
या क्रीडा महोत्सवासाठी श्री. अशोक ठानगे, श्री. ज्ञानेश्वर काठे, श्री. प्रशांत घागस , श्री. प्रशांत भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
( छायाचीत्र : पालघर चा उपविजेता संघ )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .