नांदेड जिल्हा डायटचे प्राचार्य मा.डॉ.रविंद्र अंबेकर यांची कमठाला केंद्रीय शाळेस शाळापूर्वतयारी उपक्रमासंदर्भाने भेट..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद कें.प्रा.शाळा कमठाला शाळेला डायटचे प्राचार्य रंविंद्र अंबेकर  आणि डायटचे किनवट तालुका संपर्क अधिकारी मा.अभयसिंह परिहार शाळापूर्वतयारी संदर्भाने भेट दिली.सदर भेटीत त्यांनी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या मातापालक,केंद्रातील सर्व शाळांच्या अंगणवाडीताई, शाळापूर्वतयारी स्वयंसेवक, शिक्षक यांच्याशी सुसंवाद साधत शाळापूर्वतयारी उपक्रमाचा आढावा घेतला. शाळापूर्व तयारी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना व स्वयंसेवकाना शाळापूर्वतयारीतील कृतीपत्रिका व आयडिया कार्ड नूसार साधे सोपे मनोरंजक खेळ ,कृती कशा घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन केले.


डायटचे अधिव्याखाता व किनवटचे तालुकासंपर्क अधिकारी अभय परिहार सर यांनी देखील उपक्रमाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळीमारेगाव बीटच्या शि.वि.अ.श्रीमती मनिषा बडगिरे मॅडम , दहेली बीटचे शि.वि.अ. रविंद्र जाधव सर ,कमठाला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शरद कुरूंदकर सर ,शा.व्य.स.चे अध्यक्ष श्री भारत भरकड ,विषय तज्ञ श्री इबितदार सर तसेच पं.स.गटसाधन केंद्र किनवटचे विषयतज्ञ उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन कमठाला केंद्रीय शाळेचे श्री अंकुश राऊत सर यांनी केले.




 रोहिदास तांडयातील गौरीच्या आई वडिलांचे केले कौतूक !


किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद रोहिदासतांडा शाळेला डायटचे प्राचार्य रंविंद्र अंबेकर सरानी भेट दिली.सदर भेटीत त्यांनी गावातील लोंकांशी संवाद साधला.शाळापूर्व तयारी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना व स्वयंसेवकाना  विशेष मार्गदर्शन केले.गौरी चव्हाण या पहिली प्रवेशपात्र विद्यार्थीनीची प्रथम फाउंडेशन यांच्या सौजन्याने नागपूर आकाशवाणी केंद्रात झालेल्या मुलाखतीबद्दल तिचा व तिच्या पालकांचा सन्मान व सत्कार केला.शाळापूर्वतयारीतील कृतीपत्रिका व आयडिया कार्ड नुसार रोहिदासतांडा शाळेनी घेतलेल्या कृतींचे विशेष अभिनंदन केले तसेच पहिली वर्गशिक्षिका  श्रीमती शालिनी सेलुकर मॅडमचा सत्कार केला. शाळेतील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद मागील अनेक उपक्रमाची पाहणी केली.


डायटचे अधिव्याखाता व किनवटचे तालुकासंपर्क अधिकारी अभय परिहार सर,मारेगाव बीटचे शि.वि.अ.श्रीमती मनिषा बडगिरे मॅडम तसेच दहेली बीटचे शि.वि.अ. रविंद्र जाधव सर यांनीही गौरीचे स्वागत व अभिनंदन केले.पांधरा येथील शिक्षक बी.एम.राठोड सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.याप्रसंगी किनवट गटसाधनकेंद्रातील सर्व विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.रोहिदासतांडा शाळेचे मु.अ. प्रशांत शेरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)