कामगार दिन.. नव्या समस्यांच्या उंबरठ्यावर - एड.बिभीषण गदादे

शालेयवृत्त सेवा
0

 



        

कामगार हा अत्यंत महत्वाचा तरीही कायम दुय्यम राहिलेला वर्ग. कामगारांचे दोन वर्ग प्रामुख्याने स्थळ ,काळ, परिस्थिती नुसार करता येतील. शहरी कामगार अन ग्रामीण भागातील कामगार. दोघांचे प्रश्न वेगळे आहेत येवढ्या लेखात संपुर्ण खोलात जाता येणार नाही त्यामुळे फक्त स्पर्श आढावा घेण्याचा प्रयत्न राहील.


    देशाची नव्हे जगाची अर्थव्यवस्था ह्या कामगार वर्गाच्या हातात आहे . त्यांच्या घामाची किंमत हीच राष्ट्राची संपत्ती.लोकशाहीर अन्नाभाऊ साठे म्हणाले होते "पृथ्वी ही शेषाच्या(शेषनाग) मस्तकावर नाही तर कामगारांच्या तळहाताच्या फोडावर तरलेली आहे" आणि हे खरच आहे. बडा बागायतदार असो की भांडवलदार, कारखानदार वर्ग असो कामगाराशिवाय हालचाल करूच शकत नाही. ग्रामीण भागातील छोटे शेतकरी, आणि शहरी भागातील छोटे उद्योग चालक हे स्वताच मालक व कामगार या भूमिकेत काम करतात. आजवर कामगारांचे अनेक लढे झाले, अनेक चळवळी आल्य.नेते आले. त्याची हजारो नावे सांगता येतील. आजच्या घडीला नवी आश्वासने पेलावी लागत आहेत. 

   रोजगाराचे जसे प्रकार पडतात जसे हंगामी बेरोजगार, कायम बेरोजगार, तसे कामगारांचे वर्ग पडतात. त्यातूनच हा मजुरीचा गाडा वाहीला जातो. सहा महिने कंत्राटी कामगार म्हणुन काम करायचं सहा महिने नविन काम शोधायचं. पाऊस काळात शेती काम करायचं नंतर बेरोजगार रहायचे. हे कामगार वर्गासाठी काही काळ सुखाचे तर काही काळ दु़खाचे आहेत. कंपनी कामगारांचा विचार करता दोन तीन शिफ्ट मध्ये काम करायचं उभं राहून तर उभं राहून ओहर टाईम तर ओहर टाईम त्याचा प्रेमाने अन शॉर्टमध्ये ओटी म्हणायचं.


 कंपनी कामागांरांना कंत्राटी कामगार आणि ऑन रोल कामगार अशा भेदाभेदला कायम सामोरे जावं लागत. या दोघांत प्रचंड भेदभाव केले जातात. कंत्राटी कामगार तज्ञ असले तरी त्यांना कायम दुय्यम वागणूक मिलते. (त्यावर सविस्तर बोलता येईल) 

     ग्रामीण भागात स्री कामगार आणि पुरूष कामगार हा भेद आजही कायम आहे. ऊसतोड करताना गडी कोयता व बाई कोयता दर वेगळा आहे.

स्रीयांना रोजगार कमी व पुरुषांना रोजगार जास्त. त्यामानाने स्रीयांना कमी कष्टाचे कामे दिल्याच सांगण्यात येतं पन खरच ते महत्वाचं काम नसतं का? त्याचा तेवढा फायदा होत नाही का? कमी कष्टाचे काम हे कमी रोजगाराचे कसं ठरवता येईल? त्यामुळे स्री कामगारांच्या बाबतीत कायम दुय्यम भुमिका पहायला मिलते. 


  आज पुण्यासारख्या ठिकाणी गडचिरोली ,गोंदिया, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद अमरावती विजापूर भागातून मुले व मुली कामासाठी येतात. त्याच्या कंपनीतील कामापेक्षा त्यांचे राहणे, सुरक्षा असे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत. वादाला कारण नको म्हणुन मुली ते सहन करतातही मात्र कामगार म्हणुन नवी आव्हाने आज पहायला मिळतात. 


   इकडे खाणकामगार, वीटभट्टी कामगार, स्वच्छता कामगार यांना मात्र परिस्थितीशी झुंझावं लागतं. उन असो पाऊस असो की वारा कच्ची घरे, कामाची अत्यंत असुरक्षित जागा.पाठीमागच्या महिन्यात लोणी काळभोर पुणे येथे ४ कामगार संडास साफ करण्यासाठी हौदात (पडले? /की उतरवले) आणि त्यात चौघांना गुदमरून मृत्यु झाला.जीवनाशी लढा तो कमी जीवाशी खेळ जास्त मांडला जातो. 


   कामागारांना कायद्याचं संरक्षण आहे पन ते कायदे त्याच्यापर्यंत पोहोचू दिले जात नाहीत. त्याला कायम त्याबद्दल अज्ञानी ठेवण्याचं काम केलं जातं. कामागारांना संघटन करण्याचा अधिकार नव्हता. आता तो मिळाला त्यातून संघटणाचे नेते मोठे झाले कामगार लहान राहिला.


   खरं तर या सगळ्यातून कामगारांना चांगलं वातावरण चांगला रोजगार मिळणं हे पारंपारिक आव्हान आहेच पन त्याही पेक्षा महिला कामगारांची सुरक्षा, त्यांच्यातील भेदभाव कमी करणे , त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे, ४ तास पेक्षा जास्त ओटी दिल्यास ओटीनंतर दुसर्या दिसशी पेमेंट सुट्टी देने. ग्रामीण भागातील कामागारामधील स्री पुरुष भेद कमी करने असा अनेक नव्या समस्या च्या उंबरठ्यावर असलेल्या कामगारांना नवे दिवस आणणे हे आज गरजेचे आहे. हेच आजच्या कामगार दिनाचं फलित राहील.

____________________________________

- एड. बिभीषण गदादे 

सं-7709313435

दि. १.५.२०२२

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)