किनवट तालुक्यातील रोहिदास तांड्याची मुलगी गौरी चव्हाण नागपूर आकाशवाणीवर..

शालेयवृत्त सेवा
0

 



इयत्ता पहिलित प्रवेशपात्र गौरीचे १६ मे रोजी होणार नागपूर आकाशवाणीवरून प्रसारण



नांदेड ( मिलिंद जाधव ) :

किनवट तालुक्यातील कमठाला केंद्रातील रोहिदास तांडा येथील अंगणवाडीत शिकणारी व इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशपात्र असणारी कुमारी गौरी दिलीप चव्हाण हिच्या मुलाखतीचे प्रसारण नागपूर आकाशवाणी वरून दिनांक 16 मे रोजी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी ही मुलाखत ऐकावे असे आवाहन गटशिक्षणअधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले आहे.



दिनांक 5 मे रोजी 'शाळेबाहेरची शाळा ' उपक्रमांतर्गत नागपूर आकाशवाणीवर घेण्यात आले. मुलाखती वेळी गौरी सोबत तिचे मामा बंडू सिंग राठोड व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका शालिनी शेलूकर उपस्थित होत्या. गौरीचे वडील शेतकरी आहेत तिची मातृभाषा बंजारी (गोरमाटी ) आहे. या मुलाखतीचे प्रसारण नागपूर आकाशवाणी वरून विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रेरणेने व प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि प्रथम फाउंडेशन यांच्या विद्यमाने होत आहे. 


मुलांनी स्वयंअध्ययन करावे या उद्देशाने शाळेबाहेरची शाळा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कृतीयुक्त कार्य आहे. यातील तीनशेव्या भागासाठी सदरील मुलाखतीचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. शरीराच्या विविध अवयवाचा उपयोग कशा कशासाठी होतो या विषयाला अनुसरून ही मुलाखत घेण्यात आली. दिनांक 16 मे 2022 रोजी सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी मुलाखतीचे प्रसारण नागपूर आकाशवाणी वरून होणार आहे.


 गटशिक्षणाधिकारी अनिल कुमार महामुने , सीडीपीओ अश्विनी ठाकरुड , शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा बडगिरे, डायर तालुका संपर्क अधिकारी अभय परिहार , केंद्रप्रमुख शरद कुरुंदकर , रोहिदास तांडा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, प्रथम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक शेख मसुद्दीन, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शेरे तसेच अंगणवाडी सेविका कविता चव्हाण आदिनी गौरीचे कौतुक केले आहे.


रोहिदासतांड्यातील गौरी घरी बंजारी भाषा बोलते. जास्तीत जास्त मराठी भाषा अवगत होण्यासाठी शाळेतच नाही तर घरीही मराठी भाषा बोलण्यासाठी तिच्या पालकांना प्रेरीत केले.

- शालिनी सेलुकर

( राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)