आता व्हाट्सअपवर मिळवा कागदपत्रे !

शालेयवृत्त सेवा
0

 




शालेय वृत्तसेवा :


सरकारी सेवांचा लाभ नागरिकांना अतिशय जलद गतीने घेता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून आता नमस्ते किंवा Hi म्हटल्यास आपली सर्व कागदपत्रे Digi Locker  च्या माध्यमातून ते Whats App वर उपलब्ध होणार आहेत त्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे .



🔷संकेत स्थळावर जाण्याची गरज नाही :


◼️व्हाट्सअप वापर करताना केंद्र सरकारने थेट डिजिलॉकर ॲक्सेस दिला आहे.


◼️या ग्रुपच्या माध्यमातून वापरकर्त्याला डीजी लोकर खाते उघडता पॅन कार्ड , वाहन परवाना आणि इतर अन्य कागदपत्रे हेच व्हाट्सअप वर डाऊनलोड करता येते .


◼️यासाठी डीजी लोकर च्या एप अथवा संकेतस्थळावर जाण्याची गरज नाही. वापरकर्त्यांना माय गव्हर्मेंट हेल्प डेस्क मदत मिळेल .




🔷हा नंबर सेव करा :


◼️माय गव्हर्मेंट हेल्प डेक्स आणि व्हॉट्सॲप ने मिळून डीजी लॉकर सुविधा वापरकर्त्यासाठी सादर केली आहे .


◼️व्हाट्सअप वर डीजी लॉकर सेवा सुरू करण्यासाठी सर्वात आगोदर 919013151515 हा नंबर फोन मध्ये सेव करावा लागेल .



🔷कशी मिळवाल कागदपत्रे :


◼️नंबर सेव्ह केल्यानंतर या नंबर वर डीजी लोकर hi किंवा नमस्ते लिहून व्हाट्सअप मेसेज करायचा आहे.


◼️वापरकर्ते यावर नवीन खातेही उघडू शकतात जर आपल्याकडे अगोदरच डिजिलॉकर खाते असेल तर आधार नंबर टाकून तुम्ही त्याला वापरू शकता .


◼️नोंदणीकृत आधार क्रमांकावर ओटीपी येईल त्यानंतर असे व्हेरिफाय झाल्यानंतर कागदपत्रे डाउनलोड करता येते .



🔷कोणती कागदपत्रे मिळणार :


◼️पॅन कार्ड / आधार कार्ड / वाहन परवाना / दहावी मार्कशीट / बारावीची मार्कशीट / विमा पॉलिसी / दुचाकी विमा पॉलिसी दस्तऐवज ।



वरिल चीत्राला टच करून डाऊनलोड करू शकता ।

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)