नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेडसह राज्यातील सर्व जिल्हा परीषद शिक्षकांचे पगार CMP प्रणालीद्वारे करावेत असी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद(प्रा)ने अनेक वर्षापासुन सातत्याने लावुन धरली होती. राज्य शाखेसह जिल्हाशाखेने मा.मंत्रीमहोदय, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव,मुख्यकार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी याना अनेकवेळा भेटुन पाठपुरावा केला होता.यासह अनेक संघटनाचे प्रयत्न चालुच होते. अखेर एप्रील महीण्याचा पगार CMP प्रणालीने केल्यामुळे प्रशासक मा.सौ.वर्षा ठाकुर घुगे मॅडम,शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे मॅडम यांचा म.रा.शिक्षक परीषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परीषद शिक्षकांच्या सर्व समस्या टप्याटप्याने सोडविणार आहे.असे CEO सौ.वर्षा ठाकुर घुगे मॅडमनी सांगीतले.
यावेळी राज्यकार्यकारी अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनीमागील 11वर्षापासुन प्रशासनाच्या उदासिनतेमुळे प्रलंबीत असणारा निवडश्रेणीचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा असी आग्रही मागणी केली. त्याचबरोबर निवेदनाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्या.
(1) गुणवत्ता वाढीसाठी केंद्रप्रमुख,पदो.मुअ व विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या कराव्यात त्यानंतरच समायोजन करावे.
(2)सर्व पात्र विषय शिक्षकाना पदवीधर वेतनश्रेणी लागु करावी.
(3)चट्टोपाध्याय वेतनश्रेणीचे आदेश निर्गमीत करावेत.
(4)मेडीकल प्रतीपुर्ती प्रस्ताव मंजुरीचे आदेश विभागप्रमुख म्हणुन शिक्षणाधिकारी याना दयावेत.
(5)महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलत योजनेचा लाभ दयावा.यासह सर्व प्रलंबीत प्रश्न निकाली काढावेत अशी मागणी विभागीय संजय कोठाळे,जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे यानी केली.यावेळी 10 जुनपर्यंत पदोन्नत्या करणार असल्याचे मा.मुकाअ मॅडमनी सांगीतले.
शिष्टमंडळामधे राज्यकार्यकारी अध्यक्ष मधुकर उन्हाळे, विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे,माध्यमीकचे जिल्हाध्यक्ष दिगंबर मांजरमकर,जिल्हासरचिटणीस दिगंबर पाटील कुरे,कोषाध्यक्ष बालाजी पांपटवार,संपर्कप्रमुख संतोष साखरे,व्यंकट गंदपवाड,यशवंतराव पतपेढीचे सचिव विजय गबाळे,गुरूकृपा प्रतिष्ठाणचे सचिव बळवंत मंगनाळे,देगलुर तालुकाध्यक्ष सतीश पा.सांगवीकर उपस्थीत होते.CMP प्रणालीसाठी योगदान देणार्या संर्वाचे हार्दीक अभिनंदन करण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .