नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचा नुकताच नांदेड जिल्हा दौरा संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपूर येथील मुख्याध्यापक बशीर पठाण यांनी श्री कुलकर्णी यांची भेट घेऊन शाळेची माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापक पठाण यांचे कौतुक करून हेरंब कुलकर्णी म्हणाले, केवळ चाळीस पटसंख्येवरून दोन वर्षात सव्वाशे विद्यार्थी संख्या होणे ही साधी गोष्ट नाही. व्यंकटेश चौधरी यांनी तुमची शिफारस करणे हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुढच्या वेळी तुमच्या शाळेला नक्की भेट देईन असे आश्वासन त्यांनी दिले. या दौऱ्यात त्यांनी दैनिक प्रजावाणीच्या सहकार्याने कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.
या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम पाटील, डॉ पी. डी. जोशी पाटोदेकर, मानसीच्या संपादिका सौ अनुजा डोईफोडे, शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ विलास ढवळे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, शिवाजी आंबुलगेकर, डॉ हेमंत कार्ले, बसवंते नांदेडमधील शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या अधिकारी आणि शिक्षकांची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .