जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार 20 ते 26 मे दरम्यान ..

शालेयवृत्त सेवा
0

 



जिल्ह्यातील सार्वत्रिक बदल्या : शिक्षकांच्या बदल्या वगळून होणार


नांदेड (शालेय वृत्तसेवा) :

 जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या होणार किंवा नाही या संभ्रमात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला मुहूर्त सापडला असून येत्या तारीख 20 ते 26 मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.



जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी काढलेल्या आदेशाने कर्मचारी यातील संभ्रम दूर झाला असून येत्या 20 ते 26 मे दरम्यान जिल्हा परिषदेतील समुपदेशन बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात होणार आहे. ही बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात येणार आहे.



समुपदेशन बदली प्रक्रिया च्या पहिल्या दिवशी दिनांक 20 मे रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या समक्ष सकाळी 10 ते 12 वेळेत बांधकाम विभाग दुपारी 12 ते 1 लघुपाटबंधारे विभाग दुपारी 1 ते 3 या वेळेत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व त्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत महिला बालकल्याण विभागाच्या सार्वत्रिक बदली प्रक्रिया चालणार आहे. बदली प्रक्रिया च्या दुसऱ्या दिवशी 21 मे रोजी कृषी विभाग सामान्य प्रशासन विभागाची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दिनांक 23 मे रोजी आरोग्य विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांसाठी यांची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 



दिनांक 24 मे रोजी शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्या वगळता अन्य पदासाठीच्या बदल्या करण्यात येणार आहेत. दिनांक 25 मे रोजी ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे बदली प्रक्रिया च्या शेवटच्या दिवशी पशुसंवर्धन विभाग विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडणार आहे. बदलीपात्र कर्मचारी यांनी ठरवून दिलेल्या दिवशी जिल्हा परिषद येथे यावे असे आवाहन करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)