सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार 2022 बोद्धी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन तर्फे राज्यातील 30 शिक्षकांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले गेले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा जीवन गौरवच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी औरंगाबाद येथे दिनांक 22/5/2022 रोजी पार पडला आहे.
पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड व उद्घाटक माननीय खासदार प्रो. डॉ.सुनील गायकवाड, सौ.मीरा वाघमारे, मा.रामदास वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदरील पुरस्काराचे निकष हे शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील कार्याची नोंद घेऊन निवड करण्यात आली होती.
या पुरस्कार विजेत्यांमध्ये 100 फुटी परिसरातील सरोवर शिक्षण मंडळ या संस्थेची अल अमिन मराठी प्रायमरी स्कूल सांगली मधील सहाय्यक शिक्षिका सौ.अस्मा अमजदखान नदाफ यांची राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली होती त्यांना शाल, फेटा, प्रमाणपत्र व पंचधातूने बनलेली आकर्षक शील्ड देऊन सहकुटुंब सन्मानित करण्यात आले. सदर कार्यासाठी संस्थेचे संस्थापक हाजी मुनीरुद्दिन मुल्ला, अध्यक्ष श्री.अकिवाटे, सचिव हारूनरशीद मुल्ला व शाळेचे मुख्याध्यापिका सौ.शहनाज मुल्ला यांचे सहकार्य व शुभेच्छा मिळाल्या.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .