सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या शाळेतील सर्व मुलांचे शिकणे आनंददायी पद्धतीने सुरू राहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाइन पद्धतीने विविध शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत त्यामधील प्रत्येक शनिवार शिकू आनंदे (LEAR WITH FUN) पण या उपक्रमाअंतर्गत सांगली येथील अल अमिन मराठी प्रायमरी स्कूल ची निवड झाली असता त्या शाळेत मधील सौ अस्मा नदाफ यांनी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसह संगीतबद्ध हालचाली या विषयावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल ए.टी.एम राष्ट्रीय शिक्षक संमेलनकृतिशील शिक्षक महाराष्ट्र ऍक्टिव्ह टीचर महाराष्ट्र पंढरपूर येथे 15 मे रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालक मा. दिनकर टेमकर साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित SCERT उपसंचालिका डॉ. नेहा बेलसरे मॅडम ,दिल्ली येथील मेंटॉर शिक्षिका आदरणीय मनु गुलाटी मॅडम, केरळ येथील शिक्षणतज्ञ आदरणीय विधू नायर सर, राजस्थान येथील ॲप गुरु इम्रान खान सर, पंढरपूर येथील गट शिक्षण अधिकारी नाळे साहेब, एटीएम राज्य संयोजक विक्रमदादा अडसूळ, सहसंयोजक नारायणदादा मंगलाराम, ज्योतीताई बेलवले,गडचिरोलीचे राष्ट्रीय आदर्श शिक्षक खुर्शिद शेख आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय SCERT संचलित शिकू आनंदे या कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल सौ. अस्मा अमजदखान नदाफ शाळा अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल सांगली, तालुका- मिरज जिल्हा- सांगली यांना ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन SCERT व ATM परिवाराकडून सन्मानीत करण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .