२९ मे रोजी 'पहिले आंतरराष्ट्रीय कवयित्रींचे मधुसिंधू काव्यसंमेलन'

शालेयवृत्त सेवा
0

 


डाॅ.घाणेकर संपादित 'डहाळी ' विशेषांकाचे होणार प्रकाशन !


 पुणे ( विशेष प्रतिनिधी ) :

'विश्व मधुसिंधू' संस्थेतर्फे रवि. दि. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता पहिले 'आंतरराष्ट्रीय निमंत्रित कवयित्रींचे ऑनलाईन मधुसिंधू काव्यसंमेलन' आयोजित करण्यात येत असल्याचे 'विश्व मधुसिंधू' संस्थेच्या अध्यक्षा माधुरी काकडे यांनी कळविले आहे. सदर संमेलन पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.


संमेलनाचे उद्घाटन अक्षरआनंद इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. योगेश जोशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. मधुसिंधू काव्यप्रकाराच्या प्रवर्तक कवयित्री माधुरी काकडे यांना याच सोहळ्यात वर्ल्ड लीटरेचर संस्थेतर्फे डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते 'आंतरराष्ट्रीय मधुसिंधू सुवर्णकमळ' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


या संमेलनासाठी भारतासह इंग्लंड, दुबई, जर्मनी, अमेरिका, सिंगापूर, मधील सुमारे 25 कवयित्रींना निमंत्रित करण्यात आले आहे. युवा आघाडीच्या कवयित्री प्रतिमा काळे आणि राजश्री मराठे या संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत.  डाॅ.घाणेकर संपादित 'डहाळी ' विशेषांकही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.


राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधिक्षक सुरेखा दुग्गे तसेच ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. प्रतिभा झगडे, पुणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय मधुसिंधू काव्यगौरव, मधुसिंधू काव्य संवर्धन पुरस्कारांचे वितरण समारोपात करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)