IAS मिळत असतानाही IPS निवड !
तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयपीएस - सुमित रामटेके
यवतमाळ (विशेष प्रतिनिधी) :
वणी तालुक्यातील शिरपूर येथील रहिवासी असलेले सुमित रामटेके हे आयपीएस झाले आहे. 358 रँक मिळवत सुमित ची IPS साठी निवड झाली आहे. सुमित चा हा सातवा प्रयत्न होता. यापूर्वी सुमितची सशस्त्र पोलिस विभागात असिस्टंट कमांडर पदी निवड झाले होती. मात्र आयपीएस हेच ध्येय असल्याने सुमितने नोकरीवर रुजू न होता पुढे प्रयत्न सुरु केले. 2019 साली सुमित ने UPSC परीक्षेत 748 मिळवत यश प्राप्त केले.
त्यानंतर सुमितने केंद्र सरकारच्या अपार्टमेंट कार्य मंत्रालयांतर्गत नवी दिल्लीतील इंडियन डिरेक्टर या पदावर रुजू झाले. सध्या याच विभागात कार्यरत आहेत मात्र अखेर त्यांची या वेळी आयपीएस साठी महाराष्ट्र मधून निवड झाली आहे. त्यांना मिळत असताना देखील त्यांनी आयपीएसची निवड केली हे विशेष ! त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सुमित हे सर्वसामान्य कुटुंबातील असून कठोर परिश्रमातून त्यांना हे यश मिळवले आहे.
सुमित चा प्रेरणादायी संघर्ष :
सुमित सुधाकर रामटेके हे एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहे. वडील सुधाकर रामटेके हे शिरपूर येथील गुरुदेव शाळेत परिचारक तर आई घोषणा रामटेके या गृहिणी. सुनील प्राथमिक शिक्षण शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. मात्र सुमित मध्ये शिकण्याची जिद्द होती शहरात शिक्षणाच्या अधिक संधी मिळते या कारणाने त्याने सातवीनंतर शिक्षणासाठी घर सोडण्याचा निश्चय केला व येतील जनता शाळेत प्रवेश घेतला. पुढील शिक्षणासाठी त्यांनी थेट नागपूर गाठले. नागपुरातील सोमलवार महाविद्यालयातून त्यांनी बारावी केले दुसरीकडे घरची परिस्थिती बेताची होती. त्यांना नोकरीही लागली मात्र यांचे शिक्षण आणि सांभाळ योग्यरीत्या व्हावा यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. सुमित शिक्षणासाठी परिश्रम घेत होता तर दुसरीकडे घर खर्च मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून वडिलांसोबत सुमित ची आई ही कठोर परिश्रम घेत होती. त्यांच्या आईने गावातच शिवणकला व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला.
सुमित ने अचानक तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधले ते बारावीमध्ये आयआयटी एंट्रन्स परीक्षेच्या निकालानंतर त्यावेळी जिल्ह्यात केवळ दोन विद्यार्थी यासाठी पात्र ठरले होते. त्यातला एक म्हणजे सुनील ! एका गावातील मुलगा जिल्ह्यात टॉप करतोय हा सर्वासाठीच सुखद धक्का होता. पुढे सुमितने वाराणसी येथे प्रवेश घेतला त्याने 2015 मध्ये पूर्ण केले. सर्वांना त्यातल्या त्यात पास झालेल्या मुलांना नोकरी मिळतेमात्र सुमितच्या मनात काहीतरी वेगळेच होते त्याला केवळ पैसे कमावून देणारे नोकरी नाही तर समाज घडवणारे नोकरी करायची होती. हे सिस्टिम बदलायचे असेल तर आधी त्या सिस्टीमचा भाग होणे गरजेचे आहे अशी त्यांची धारणा आहे. यासाठी त्याने इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षीच प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले त्यात त्यांना यशही आले सुमितला विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस बल विभागात असिस्टंट कमांडर पदी निवड झाली मात्र सुमित आयपीएस असल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली त्यात त्यांना पुन्हा 748 त्यानंतर सुमित हे केंद्र सरकारच्या दिल्लीतील इंडियन कॉर्पोरेट लॉ भागात असोशियन या पदावर रुजू झाले.
आयपीएस हे अधिक चॅलेंजिंग ! सरफरोश चित्रपटातील आमिर खानची S P अजय कुमार जी व्यक्तिरेखा आपल्या सर्वांनाआठवत असेलच. यात एसपी अजय कुमार आयएएस मिळत असतानाही आयपीएस घेतो. तसेच काहीसे ध्येय होते. पोलीस विभागाचा सर्वाधिक प्रभाव हा समाजात असतो शिवाय हा एक चॅलेंजिंग जॉब आहे. सर्वसामान्य तळागाळातील लोकांना अद्यापही न्याय मिळत नाही त्यासाठी आयपीएस हा सर्वात चांगला पर्याय वाटतो. त्यामुळे सहज मिळणे शक्य असतानाही आयपीएस घेण्याचा निर्णय घेतल्याची प्रक्रिया रामटेके यांनी दिली .
परिसरातील व ग्रामीण भागातील मुलांना मदत करणार :
परिसरात अनेक विद्यार्थ्याकडे क्षमता आहे मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने आपल्याकडील मुलांना योग्य ती संधी मिळत नाही. गाव खेड्यातील मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे. यासाठी जी काही मदत लागेल ती मदत आणि मार्गदर्शन करण्यास मी कुठेही कमी पडणार नाही. वाचन अभ्यास या गोष्टी व्यक्तीला घडवतात त्यामुळे यावर्षी वणी मध्ये आणि त्यापुढे शिरपूर येथे अभ्यासिका आणि वाचनालय सुरु करण्याची इच्छा आहे असे प्रतिक्रियाही समितीने दिली. सुमितच्या यशाने सर्व गाव आणि परिसर हुरळून गेला आहे. त्याच्यावर सर्वांकडून कौतुकाचा वर्षा होत आहे. सुमित या यशाचे सर्व श्रेय आई वडिलांना देतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या पालकांनी त्यांना घडवलं आईच्या त्या घरात सर्वाधिक महत्त्व देतो बाहेर शिकताना नागपूरला असलेली त्याची ताई उज्वला लोखंडे आणि भाऊजी मिलिंद लोखंडे यांनी त्याला सांभाळले व्हिजन आयएएस अकादमी नागपूर तिथले शिक्षक विजय यांनाही तो या यशाचे श्रेय देतो. यासह तो मित्राच्या आभार मानतो यूपीएससी च्या तयारीत मोठा कालखंड गेला त्या काळात मानसिक स्वास्थ्य सांभाळणे अत्यंत गरजेचे असते अशावेळी गावातील मित्र तसेच कॉलेज व सरकारमध्ये मित्राने वेळोवेळी मानसिक बळ दिले अशा मित्रांचाही यशात मोठा वाटा असल्याचे सुमित सांगतो .
( कुटूंबा सोबत )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .