यवतमाळ (विशेष प्रतिनिधी) :
पंचायत समिती वणी येथील प्रगती नगरातील रहिवासी असलेल्या डॉ. आकांक्षा मिलिंद माधुरी तामगाडगे यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत 562 रँक मिळवली आहे.
डॉ. आकांक्षा यांनी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आहे दोन वेळा अपयश येऊनही त्यांनी अथक प्रयत्न करत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या यूपीएससी परीक्षेच्या निकालांमध्ये जिल्ह्यात वणी तालुक्यातील शिरपूर येथील सुमित रामटेके यांनीही यशश्री मिळवली आहे.
डॉ. आकांक्षा ह्या डॉ. मिलिंद तामगाडगे व डॉ. माधुरी तामगाडगे यांची कन्या आहे. डॉ. मिलिंद तामगाडगे हे वैद्यकीय सेवेत कार्यरत असून त्याचे वणी येथे हॉस्पिटल आहे तर डॉ. माधुरी तामगाडगे या सध्या पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. त्यांनी वणीतील देखील मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले आहे. डॉ. आकांक्षा यांनी यवतमाळ येथे त्यांच्या आजोळी आपले प्राथमिक ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी सेवाग्राम येथील सुप्रसिद्ध महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केले. वैद्यकीय सेवेत जाण्यासाठी आकांक्षा ने पुणे गाठले. तिथे सहा महिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही त्यानंतर त्यांनी यवतमाळ वणी येथे राहूनच UPSC तयारी पूर्ण केली. दुसऱ्या प्रयत्नात त्या मुलाखतीपर्यंत पोहोचल्या मात्र त्यांना परीक्षेत अपयश आले होते. आपल्या यशाचे श्रेय आई-वडील मावशी यांना देते.
IAS हेच ध्येय : डॉ. आकांक्षा
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर असल्यानेच हे यश प्राप्त करता आले. UPSC परीक्षा जरी कठीण असली तरी ती अशक्य नाही त्यामुळे IPS मिळाल्यास जॉईन करणार अन्यथा IAS साठी आणखी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर आकांक्षा यांनी दिली.
सार्थ अभिमान आहे आम्हाला तुम्ही यशस्वी झाल्याचा. अभिनंदन डॉ. आकांक्षा तामगाडगे. व सुमित रामटेकेचे.
उत्तर द्याहटवा