पुणे ( विशेष प्रतिनिधी ) :
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या आता हिरवा कंदील मिळाला आहे 30 जून पर्यंत बदल्या करण्यासाठी मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून शतप्रतिशत बदल्या पूर्ण करण्याची हमी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली तसेच बदली सुधारणा समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता 25 मेपर्यंत मंत्रालयात सॉफ्टवेअर चाचणी करण्यात येणार आहे त्यानंतर दोन दिवसात बदली प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात पत्र काढले जाईल असे शिष्टमंडळाला सांगितले.
शिक्षक बदली प्रक्रिया कशा पद्धतीने यासंदर्भात एका समितीचे गठन करण्यात आले होते त्या समितीने बदली प्रक्रिया याबाबत शिफारस अहवाल शासनाला दिला होता त्यानुसार सॉफ्टवेअरची निर्मिती करण्याचे ठरविण्यात आले होते ते सॉफ्टवेअर मराठी आणि इंग्रजी भाषेत असणार आहे मोबाईल येणार आहे.
हे सॉफ्टवेअर संगणकासह मोबाईल ॲप द्वारे वापरता येणार आहे बदली करता राज्य शासनाने सॉफ्टवेअरची निर्मिती सुरू केली होती. त्यामुळे पुणे सातारा आणि वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली त्या समितीच्या अनेक बैठका बदली प्रक्रिया वेगळी आणि पारदर्शक करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली. समितीचे सदस्य वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीत करण्यात करण्याबाबत चर्चा करण्यात आली आता ही बदली प्रक्रिया वेगाने आणि पारदर्शक करण्यासाठी लवकरच होणार आहे . त्याची तयारी पूर्ण करून दोन दिवसात चाचण्या घेतल्या नंतर ॲप मधील अडथळे दूर करून बदल्या केल्या जाणार आहे .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .