जि.प.प्रा.शा.गणेशपूर जुने येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

विद्यार्थ्यांनी केलेल्या महामानवाच्या वेशभूषेने वेधले गावकऱ्यांचे लक्ष

 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जि.प.प्रा.शा.गणेशपूर जुने येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी सर्वात प्रथम  गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली गावात स्वच्छता मोहीम करण्यात आली.पहिली प्रवेश पात्र मुलांच्या घरी जाऊन त्यांना शाळेत आणले, प्रभात फेरी संपल्यानंतर सर्वजण शाळेच्या प्रांगणात जमले .नंतर  प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले .


यावेळेस  गावातील ज्येष्ठ नागरिक तुकाजी आत्राम, शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष विजय मेश्राम, युवक गजानन कुडमेथे,अरविंद कुसराम, प्रकाश आत्राम, संदिप गाडे,अं.से.कल्पना बावणे,शिक्षक मित्र-विदेक्षा जुगनाके,पुनम पेंदोर, पुजा कर्हाळे,पुजा बोखारे तसेच स्वयंपाकी पारूबाई आत्राम इत्यादी उपस्थित होते.ध्वजारोहण झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रवीण पिल्लेवार यांनी सविस्तर प्रास्ताविक करून त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू केले प्रथम इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत च्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट देण्यात आला.


 सर्वच विद्यार्थी खुप खुश झाले , त्यानंतर चौथी पास विद्यार्थाना वह्या, पेनी, खाऊ ,चाॅकलेट ,उन्हाळी अभ्यास पुस्तके,व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.चौथीत दाखल विद्यार्थ्यांना उन्हाळी अभ्यास पुस्तके दिली,तिसरी दाखल पात्र विद्यार्थ्यांना उन्हाळी अभ्यास पुस्तके दिली , पहिलीस प्रवेश पात्र  विद्यार्थ्याना शाळापूर्व तयारीचे पुस्तक वाटप केले.शिक्षक मित्र नेमणुक करून त्यांना साहित्य व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्या नंतर सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला कोविड मुळे दोन वर्षा पासुन घेवू न शकल्या मुळे सर्वच विद्यार्थी जणु काही आनंद उत्सवच साजारा करीत आहेत असे वाटत होते. गावातील नागरिक मंत्रमुग्ध होवून पाहात होते . 


विविध वेशभुषा केलेले विद्यार्थी राष्ट्रसंत गाडगेबाबा-ओमकार  रणमले, जननायक बिरसा मुंडा-रोहण आत्राम, विठ्ठल नांदे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर-ओमकार  पिल्लेवार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे- शिवेंद्र  पिल्लेवार, राष्ट्रमाता जिजाऊ-पुर्वी आरके,राणी लक्ष्मीबाई-रितीका चिक्राम  , सावित्रीबाई फुले- पुर्वी मेश्राम,शेतकरी- सत्यम सुरोशे, ईश्वर आरके अशा सुंदर वेशभूषा करून त्यांनी भाषण करून आपापला परिचय करून दिला. सर्वात शेवटी  स.शि.परभणकर  मॅडम यांनी शाळापूर्व तयारी विषयी थोडक्यात माहीती देऊन सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्व विद्यार्थी ,पालक,गावातील सर्व जमलेले नागरिक यांना  चाॅकलेट ,खाऊ पॅकेट व चहा देऊन कार्यक्रम सांगता झाली .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)