वैजाली जि.प.शाळेत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, शिक्षण विभाग नंदुरबार व नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय कृती आराखड्यानुसार शालेय आपत्ति व्यवस्थापण समिती , शिक्षक, विदयार्थ्याना एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम, शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा व शालेय मॉकड्रिल ( रंगीत तालिम ) कार्यक्रम शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे व्यवस्थित संपन्न झाला. 


नैसर्गिक आपत्ती भूकंप, महापूर, चक्रीवादळ, भूस्खलन, सुनामी, दुष्काळ,  ज्वालामुखी व मानवनिर्मित आपत्ती आग, पारंपरिक युद्ध, जैविक युद्ध, रासायनिक युद्ध, आण्विक युद्ध, जातीय दंगल, बाॅम्बस्फोट , अग्नीशमन यंत्रणा हाताळण्याचे कौशल्य इ.विषयी माहिती प्रशिक्षक ज्योती पाटील, रंजित कोळी यांनी दिली. सदर कार्यक्रम शारीरिक अंतर, मास्क , सॅनिटायझर यांचा वापर करून कोविडच्या सुरक्षा नियमांचे पालन करून घेण्यात आला. कोविड १९ परिस्थिती असल्याकारणाने मास्क, खाद्य बिस्किट उपस्थितांना देण्यात आली. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमात आपत्ति व्यावस्थापन विषयक कोविड १९ लसीकरण संदर्भात जाणीव जागृती विषयक माहिती देण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, शिक्षक भरत पावरा,राजू मोरे, चंदु पाटील, उषा पाटील, गोपाल गावीत तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार राजू मोरे यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)