निळा जिल्हा परिषद शाळेत 'शाळा पूर्व तयारी मेळावा ' उत्साहात..

शालेयवृत्त सेवा
0




नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा ता.जि.नांदेड येथे मुख्याध्यापक श्री चोंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यां मेळाव्यास शालेय व्यवस्थापन समिती निळा चे अध्यक्ष श्री शिवाजीरावभाऊराव जोगदंड,श्रीमती जाधव मॅडम अधीक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र निळा,श्रीमती कोमल रोहित हिंगोले सरपंच ग्रामपंचायत निळा,श्रीमती काशिफा मॅडम प्रथम सेवाभावी संस्था नांदेड, श्यामसुंदर जोगदंड समिती सदस्य,हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.


         सकाळी ठीक 8:45 ला गावातील प्रमुख रस्त्याने ढोल, लेझिम सहित शाळेतील सर्व मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली.शाळांपूर्व तयारी ची माहिती देणारे बॅनर्स,शाळेत मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती देनारे चार्ट,आणि

आपली मुळे शाळेत पाठवा,

मुला मुलीत भेदभाव करू नका,

लेक वाचवा लेक शिकवा,

झाडे लावा झाडे जगवा,

भारत माता की जय,

अश्या घोषणानी संपूर्ण निळा गाव आणि गावातील रस्ते दुमदु मून निघाले.



        प्रभात फेरीत मुख्यध्यापक यांच्या सह निळा शाळेतील सर्वच शिक्षक-शिक्षिका,तिनही अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीस,सरपंच कोमल हिंगोले,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आणि शाळेतील सर्व विध्यार्थी उपस्थित होते.

           शाळांपूर्व तयारी च्या मेळाव्याचे सरपंच आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजीराव जोगदंड यांच्या हस्ते रिबीन कापून उदघाटन करण्यात आले.

           प्रास्ताविक : के. पी. पोहरे सर यांनी प्रस्ताविकातून उपस्थित माता पालक यांना या मेळावा घेण्या मागचा हेतू.आणि आज या शाळेत लावण्यात आलेल्या 7 स्टॉल वर जाऊन काय काय करायचे आहे याची माहिती दिली.आणि या मेळाव्याची काय गरज होती.

मागील दोन वर्ष्यापासून सर्व विद्यार्थी आणि पालक वर्ग कोविड च्या प्रभावाखाली दिशाहीन झाला आहे.आणि पुढील वर्ष्यात शाळेत येणाऱ्या मुलांना त्या दडपनातून बाहेर काढणे,त्यांच्या मातांना सुरक्षिततेचि हमी देणे. आणि महत्व समजावून सांगणे यावर संवाद साधला.


          जाधव मॅडम : आपल्या मनोगतातून त्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.मातांना आणि मुलांना पौस्टिक आहार आणि आरोग्य याचे महत्व समजाऊन सांगितले. आपल्या बाळाच्या आरोग्यात आईच कसा सर्वात मोठा हातभार असतो ते माता पालक यांना समजून सांगितले.आणि शाळेला एक पालक म्हणून वेळोवेळी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


          काशिफा मॅडम :प्रथम या सेवाभावी संस्थेच्या वतीने त्या या मेळाव्यास उपस्थित राहिल्या आणि माता पालक वर्गाना हिंदीतून संवाद साधला. आपल्या संस्थेचा हेतू, समर कॅम्प कसा आणि कुठे राबवला जाणार याची माहिती. तसेच संस्थेच्या वतीने इयत्ता पहिली ते पाचवी तील मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवणार असल्याचे सांगितले.तर आजचा शाळापूर्व तयारी चा मेळावा घेण्याचे कारण आणि त्याचे फायदे याचीही स्तुती केली.


       अध्यक्षीय समारोप :2022 -23 साठी इयत्ता पाहिलीत एकूण 41 विध्यार्थी प्रवेशपात्र असून जवळपास 30-35 प्रवेश आज झाले ही सर्वात मोठी आनंदाची घटना इथे घडली. आपण सर्व वेळातला वेळ काढून या मेळाव्यास उपस्थित राहिलात आणि तुमच्या सहकार्यामुळे आजचा शाळांपूर्व तयारी चा मेळावा यशस्वी झाला.आपल्या मुलाकडे लक्ष दया,आई या नात्याने त्याच्या अभ्यासात त्याला मदत करा,मूल हे आईच्या सहवासात सर्वात जास्त वेळ राहते म्हणून त्याचे भविष्य तुमच्या हातात आहे.कोणतीही अडचण असेल तर शाळेत किंवा वर्गशिक्षक यांना भेटा त्यांच्याशी चर्चा करा.सर्वांचे आभार मानून अध्यक्षीय समारोप केला.



      इयत्ता पाचवी ते सातवीतील मुलींनी सुंदर लेझिम धून सादर केली,तसेच सर्व मुलांनी काल पासून शालेय परिसर स्वच्छ करणे,मैदानावर पाणी मारणे,रांगोळी काढणे,आणि इतर कामे स्वतः होऊन केले त्या मुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.


         हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून काल घरोघरी जाऊन पाम्पटवार मॅडम, कर्णेवार मॅडम,मोखंडपल्ले मॅडम आणि वाघमारे मॅडम यांनी मुलांचे प्रवेश फॉर्म भरून घेतले. गंजेवार मॅडम,रत्नपारखी मध्ये,बेळगे सर,पोहरे सर यांनी परिसर स्वच्छ,आणि इतर नियोजन केले.सर्व सहभागी शिक्षक आणि विध्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहरे के.पी.यांनी केले तर आभार श्री बेळगे एस. एच.यांनी मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)