नांदेड जिल्हा परिषद महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा विविध समाजोपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करणार.. - नांदेड जिपच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर-घूगे

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( मिलिंद जाधव) :

समाजाच्या परिवर्तनासाठी समाजसुधारक व महापुरूषांच्या विचारांचा प्रचार -प्रसार व्हावा यासाठी नांदेड जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. कोविड निर्बंधामुळे मागील दोन वर्षापासून सार्वजनिक कार्यक्रमास बंदी असल्यामुळे जयंती महोत्सव मोठ्या स्वरूपात घेता आले नाही परंतू आता शासनस्तरावरुनच कोविङ निर्बंध शितिल झाल्यामुळे यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा  संयुक्त जयंती सोहळा आभिवादन, व्याख्यान, समाज प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, आंबेडकरी जलसा,अन्नदान, आंबेडकरी अनुयायांनी शितल पेयजल वाटप, जिप मुख्यालयावर विद्युत रोषनाई आदी विविध उपक्रमांव्दारे मोठया स्वरुपात साजरा केली जाईल असे स्पष्ट प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर-घूगे मॅडम यांनी नांदेड जिल्हा परिषद अधिकारी/ कर्मचारी जयंती मंडळाच्या महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा पूर्वतयारी बैठकीत मार्गदर्शन करताना दिले आहे. 


याप्रसंगी अतिरिक्त मुकाअ मा.संजय तुबाकले साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मा.सुधीर ठोंबरे साहेब,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.रावसाहेब कोलगणे , उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.शेखर कुलकर्णी साहेब, समाजकल्याण अधिकारी  यांची प्रमुख उपस्थिती होती.


       यावेळी नांदेड जिल्हा परिषद महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर अधिकारी / कर्मचारी  संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने मा.डॉ.उत्तम सोनकांबळे, मा.बालासाहेब लोणे, मा. प्रल्हाद थोरवटे, मा.अशोक कासराळीकर, मा.राजेश जोंधळे, मा.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, मा.राजेंद्र मदनुरकर, मा.विजयसिंह चौहान, मा.पी.पी.पिंपळढोहकर, मा.प्रताप रायघोळ, मा.प्रमोद गायकवाड, मा.अशोक बनसोडे, मा.गणेश अंबेकर, मा.पवन तलवारे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)