शिक्षक समीक्षक प्रशांत ढोले यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना निरोप..

शालेयवृत्त सेवा
0



वर्धा ( शालेय वृत्तसेवा ) :

उच्च प्राथमिक शाळा  कोळोणा(चोरे)येथे समीक्षक व शिक्षक प्रशांत नामदेवराव ढोले यांचा साहित्य सेवेकरीता सत्कार करण्यात आला.यावेळेस अध्यक्ष म्हणून राहुल कुरसिंगे(शाळा व्यवस्थापन समिती कोळोणा,चोरे) उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून कोळोणा (चोरे)येथील सरपंच सौ.आशाताई नंदकुमार भस्मे उपस्थित होत्या.तसेच मुख्याध्यापक सुमित्रा चांदेकर होत्या.सत्काराला उत्तर देतांना कवी,समीक्षक, ललितलेखक, शिक्षक प्रशांत ढोले म्हणाले,"विद्यार्थ्यांनी आई,वडील व शिक्षक यांचे म्हणणे ऐकावे.जो मेहनत, चिकाटी,जिद्द ,अभ्यासुवृत्ती ठेवतो तो विद्यार्थी जीवनात यशवंत होतो.सत्कारामुळे मनुष्य कार्यप्रवण होतो.


यावेळेस सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचा  सत्कार मान्यवर मंडळीच्या हस्ते करण्यात आला.त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या.प्रगती भुजाडे,नियती मुनेश्वर, सुजल उईके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक सुमित्रा चांदेकर मॅडम यांनी अतिशय संवेदनशील पध्दतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.संचालन सौ.राजश्री शेरजे मॅडम यांनी केले.आभार प्रदर्शन सौ.प्रविणा मैत्रे मॅडम यांनी केले.शितल मानकर,सरला थोटे ,पौर्णिमा भगत,अंजली बोंदाडे, नंदा पाचखेडे, कुरसिंगे इ.प्रतिष्ठीत मान्यवर मंडळी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)