जिल्हा परिषद शाळा सरसम (बु) येथे स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सरसम (बु) ही शाळा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सदैव नवनवीन उपक्रम व योजना आखून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी सदैव प्रयत्नशील असते.या शाळेत दि ८ मार्च २०२२ रोजी स्वयंशासन दिन म्हणजेच स्कूल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील इयत्ता सातवीच्या मुलांनी शिक्षकाची भूमिका पार पाडत इयत्ता पहिली ते सहावीच्या मुलांना त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे अध्यापन केले.


       एक दिवस सर्व शाळा ही शिक्षण बनलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सांभाळत.विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून त्यांना दैनंदिन येणारे अनुभव अनुभवता आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख कोकुलवार सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक निखिल धोबे व सलोनी कवडे, शाळेतील शिक्षक सरोदे सर,देशमुख सर,हंडरगुळे सर, घाळाप्पा सर ,गुट्टे मॅडम,इनामदार मॅडम हे शिक्षक व कु.प्राजक्ता गुट्टे,शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाळाप्पा सर यांनी केले.इनामदार मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक कोकुलवार सर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये मुलांना मार्गदर्शन केले. शेवटी कु.सानिका मिरासे हिने आभार मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी सूर्यवंशी, शालेय पोषण शिजवून देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)