शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्या हस्ते जि.प.शाळेत मेळाव्याचे उद्घाटन. !

शालेयवृत्त सेवा
0

  



नंदुरबार ( गोपाल गावित ) :

तळोदा तालुक्यातील नवागाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्यात दाखलपात्र विद्यार्थ्याचे कोरोनाचा कालावधीत शैक्षणिक नुकसान झाले किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी विविध क्षमता तपासण्यात आल्या व या क्षमता पूर्ण करण्यासाठी आवश्यक कृती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थी, पालक यांच्या विविध शंकाचे निरसन करीत त्यांना सविस्तर माहिती दिली. प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. 


मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तळोद्याचे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण ठाकरे, मोदलपाडयाचे केंद्रप्रमुख जगनाथ मराठे, केंद्रप्रमुख सुकलाल पावरा, केंद्रप्रमुख अशोक पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पालकांना माहिती देण्यासाठी सात टेबल ठेवत आले होते. यावेळी पालकांना विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत दाखल होण्यापूर्वीपासून काय भूमिका असेल यासंदर्भात माहिती देण्यात आली. 


नॅशनल सिड कॉर्पोरेशन लि. पुणे यांच्या मार्फत तळोदा तालुक्यातील सात शाळांना प्रत्येकी एक याप्रमाणे संगणक देण्यात आली आहेत . या प्रसंगी शाळेतील शिक्षक अमोल सोनपेटे, अभयकुमार सराफ , विजयालक्ष्मी पाडवी, सोनाली दळवी, सुनील पावरा आदी उपस्थित होते. यावेळी अशोक बच्छाव, महेंद्र पटले यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्याचे अशोक पाडवी, अक्षय वळवी , विजय भिलावे, नवनाथ पाडवी , अमोल सूर्यवंशी , विश्वनाथ ढोरमारे, प्रवीण जाधव, दयानंद इंगळे, समाधान घाडगे, आदम शेख, श्री. लांडे, राहुल शितोळे, दादा दुले, गोपीचंद देशमुख, अनिल भिलावे, सिद्धेश्वर गायकवाड यांनी संयोजन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)