डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या ६ ग्रंथाचे प्रकाशन ३० एप्रिल रोजी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई, दि.२७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीच्या ६ ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.


यावेळी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री आणि समितीचे उपाध्यक्ष प्राजक्त तनपुरे आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जनता’ पाक्षिक ‘१९३० ते १९५६ पर्यंत प्रकाशित झालेल्या ‘जनता’चा दुसरा खंड आणि इंग्रजी खंड १३ चा मराठी अनुवाद ‘डॉ. आंबेडकर: भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार’ - भाग-१ आणि भाग-२ या नवीन ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. इंग्रजी १३ व्या खंडाचा अनुवाद राज्यशास्त्राचे तज्ज्ञ आणि लेखक डॉ.आर. के. क्षीरसागर (औरंगाबाद ) यांनी केला आहे. तसेच सोर्स मटेरियलचा खंड -१, डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे–खंड-८ (Pakistan or Partision of India), खंड-१० (Dr. Ambedkar as a Member of the Governor General’s Executive), खंड -१३ (Dr. Ambedkar as the Principal Architect of the Constitution) या ४ इंग्रजी खंडाच्या पुनर्मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन सुद्धा यावेळी होणार आहे.


मागील काही वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीचे काम प्रलंबित होते. परंतु या वर्षापासून पुन्हा समितीने ग्रंथ प्रकाशनाच्या कामास गती आली आहे, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)