शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या रिक्त पदांचा प्रभार पुरस्कार प्राप्त शिक्षकांकडे सोपवा - संघटनेचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन

शालेयवृत्त सेवा
0

 




अमरावती ( शालेय वृत्तसेवा ) :

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  शासनाच्या शिक्षण अधिकारी पदावर सामावून घेण्यात यावेत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्यावतीने शिक्षणाधिकारी ई .झेड. खान यांना देण्यात आले.


 शासनाने यापूर्वी नेट सेट पीएचडी धारक प्राथमिक शिक्षकांना विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदी रिक्त असलेल्या पदाचा प्रभार  सोपविण्याबाबत आदेशित केले आहे तर सोबतच शासनपत्र राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षकांना सुद्धा प्रशासनाच्या विस्ताराधिकारी व्यवस्थापन या पदावर सामावून घेण्याबाबत ची माहिती मागविली होती.


 त्यामुळे सदरची माहिती शासनाकडे पाठवून जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षकांना सुद्धा रिक्त असलेल्या विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख या पदाचे  प्रभारी सोपविण्यात यावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच फलकावर राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी कार्यालयात अपडेट करण्यात यावी अशी विनंती देखील यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. शिष्टमंडळात जिल्ह्याचा विस्तार जिल्हाध्यक्ष विलास बहाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)