राज्यातील नव्वद हजार शिक्षकांना एससीईआरटीचे प्रशिक्षण..

शालेयवृत्त सेवा
0


वरिष्ठ वेतन आणि निवड श्रेणीसाठी १५ मेपासून प्रशिक्षण !


मुंबई : (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

सेवेची १२ व २४ वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातील तब्बल ९० हजारांहून अधिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन आणि निवड श्रेणीसाठी १५ मेपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण १४ जूनपर्यंत चालणार आहे. कोरोनामुळे शालेय शिक्षण विभागाकडून गत दोन वर्षांत निवड व वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण आयोजित केले नव्हते.


या प्रशिक्षणाची मागणी शाळेतील शिक्षक व शिक्षक संघटनांनी केली होती. या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया शिक्षिका निधी जैन यांनी व्यक्त केली तर मिनल डिसोझा यांच्या मते प्रशिक्षण सुलभ व सोयीस्कर होण्यासाठी विभागवार केंद्र सुरू करण्यात यावे व त्यांच्या विकेंद्रीकरणाची मागणी केली. विजय महाजन यांनी शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या शिक्षकांच्या निवड व वरीष्ठ वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे पदाधिकारीने एका निवेदनाद्वारे संबधितास केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)