राजगडतांडा शाळेत शाळा पूर्व तयारी कार्यक्रम उत्साहात साजरा; बैलगाडी,लेझीम,ढोल ताशाच्या गजरात पहिलीच्या मुलांचे स्वागत !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत प्रथम फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमनाने संबंध महाराष्ट्रात "शाळापूर्व तयारी अभियान" उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.या अनुषंगाने किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजगड तांडा येथे शुक्रवार दि.29 एप्रिल 2022 शाळापूर्व तयारी शाळा प्रवेश उत्सव बैलगाडी सजावट, लेझीम, ढोलताशा यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.


गावातील बहुतांश पालकांचा व्यवसाय शेती असल्यामुळे सर्वप्रथम पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलांची बैलगाडी सजावून नवगतांची गावातून लेझीम ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील सर्व मुलांनी मुलींनी पारंपरिक वेश परिधान केला होता त्यामुळे गावातील सर्वांनाच पहिला वर्ग प्रवेशाचा हा सण-उत्सव असल्यासारखा आनंद व्यक्त होत होता. बैलगाडी मिरवणुकीनंतर सर्व नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


शाळा पूर्वतयारीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर पुलकुंटवार यांच्या मार्गदर्शनखाली शाळेतील पहिल्या वर्गाच्या वर्गशिक्षिका ललिता येलमेवाड तसेच सुवर्णा वाढाई यांनी शाळा पूर्व तयारीची रांगोळी,शाळा सजावट याकामी प्रचंड मेहनत घेतली त्याचबरोबर हा शाळा प्रवेश उत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहकारी शिक्षक चंद्रशेखर सर्पे,सुभाष पडलवार,किसन कर्णेवार,प्रेमसागर नेम्मानीवार,मारोती भोसले यांनी मोलाची सहकार्य केले.तसेच या अभियानात गाव पातळीवर शाळा स्वयंपाकी (सेवक) रघुनाथ पवार ,गावातील डीएड विध्यार्थी आकाश राठोड, अंगणवाडीताई सोनाली मुक्कावार,क्रांतीताई कदम, अशासेविका सत्यभामा देराडे, गावातील मुलांचे पालक, ग्रामपंचायत, शा.व्य.समिती यांनी ही मोलाची मेहनत घेतल्याचे दिसून आले.


जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.गेले कित्येक महिने आपण कोरोनामुळे प्रभावित झालेलो आहोत. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला आहे. काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील. यासाठी मार्च मे २०२२ मध्ये आपण सर्वांनी मिळून, शाळापूर्व तयारी अभियान महाराष्ट्रभर मोठया उत्सवात चालू आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)